ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद - Twenty Two CRPF Personnel Killed in Naxal Attack at Chaatisgadh  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद

वृत्तसंस्था
रविवार, 4 एप्रिल 2021

छत्तीसगढमधील विजापूर भागात काल नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहिद झाले आहे. आणखी २२ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात शुक्रवारी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली होती. त्यावेळी नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यात चकमक झाली. त्यात २२ जण ठार झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. 

छत्तीसग : ढछत्तीसगढमधील विजापूर (Bijapur) भागात काल माओवादी (Maoist) नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहिद झाले आहे. आणखी २२ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात शुक्रवारी नक्षलवाद्यांना (Naxal) शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली होती. त्यावेळी नक्षलवादी आणि सीआरपीएफचे (CRPF) जवान यांच्यात चकमक झाली. त्यात २२ जण ठार झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.  Twenty Two CRPF Personnel Killed in Naxal Attack at Chaatisgadh 

#WATCH | On ground visuals from the site of Naxal attack at Sukma-Bijapur border in Chhattisgarh; 22 security personnel have lost their lives in the attack pic.twitter.com/nulO8I2GKn

— ANI (@ANI) April 4, 2021

ही पथके जोनगौडा भागात गस्त घालत असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची तीव्रता आज स्पष्ट झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी छत्तीसगढचे मुख्यमंभी भुपेश बाघेल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार हे नक्षलवादी विविध ठिकाणी भूसुरुंग पेरणार होते. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी मोहिम राबविण्यात आली होती. नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या जवानांची शस्त्रेही पळवली आहेत. 

रम्यान, या घटनेनंतर छत्तीसगढमध्ये सुरक्षा दल व प्रशासनाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी रामनाथ कोविंद यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख