अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विषारी साप; खासदार बॅनर्जींची घसरली जीभ

पश्चिम बंगालमध्ये विस्तार करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडूनही भाजपला रोखण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून, दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.
tmc mp kalyan banerjee compares nirmala sitharaman to venomous snake
tmc mp kalyan banerjee compares nirmala sitharaman to venomous snake

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तुलना विषारी सापाशी केली आहे. बांकुरा येथे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करताना बॅनर्जी यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.  इंधन दरवाढीस केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, विषारी साप ज्याप्रमाणे माणसांना मारुन टाकतो, त्याप्रमाणे देशातील नागरिक आता मरत आहेत. याला निर्मला सीतारामन या कारणीभूत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. 

याआधी कल्याण बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नवा भारत घडविण्याचे स्वप्न दाखविले. प्रत्यक्षात त्यांनी विकासदराची वाढ खाली आणली. आता विकासदर त्यांनी एकदम तळाला पोचविला आहे. 

बॅनर्जी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून निषेध होत आहे. भाजपने या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यावरील आणि पक्षावरील पकड ढिली होत असल्याची टीकाही भाजपने केली आहे.  

तृणमूलची वकिली करणारे बॅनर्जी 

कल्याण बॅनर्जी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. बॅनर्जी हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, वकील आहेत. तृणमूल काँग्रेसशी निगडित खटल्यांचे कामकाज तेच सांभाळतात. ते कोलकता उच्च न्यायालयात  1981 पासून वकिली करीत आहेत. 

लखनौ : उत्तर प्रदेशात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबेला पोलिसांचा छापा पडणार ही माहिती खुद्द पोलिस ठाण्यातूनच फोनद्वारे मिळाल्याची धक्कादायक माहिती त्याच्या साथीदाराने पोलिसांना दिली आहे. दया शंकर अग्निहोत्री असे या साथीदाराचे नाव असून त्याला आज सकाळी पकडण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com