मोदीजी, सत्यासाठी लढणाऱ्यांना तुम्ही घाबरवू शकत नाही : राहुल गांधी

राजीव गांधी फाउंडेशनसह नेहरु-गांधी घराण्याशी निगडित ट्रस्टची चौकशी करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले असून, यावर आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारले आहे.
those who fight for truth cannot be intimidated says congress leader rahul gandhi
those who fight for truth cannot be intimidated says congress leader rahul gandhi

नवी दिल्ली : गांधी परिवाराशी संबधित तीन ट्रस्टने केलेल्या आर्थिक व्यवहारांची चैाकशी करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांनी आर्थिक व्यवहार नियम डावलून केल्याची चैाकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक समिती नेमली आहे. यावर आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उत्तर दिले असून, सत्यासाठी लढणाऱ्यांना घाबरवता येणार नाही, असा टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटरवर या प्रकरणी सरकारला उत्तर दिले आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही चौकशीचा उल्लेख करणे टाळले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळे जग त्यांच्याप्रमाणेच आहे, असे वाटते. प्रत्येक गोष्टीची किंमत आहे अथवा सर्वांना घाबरवता येते, अशी त्यांची धारणा आहे. सत्यासाठी लढणाऱ्यांची तुम्ही किंमत लावू शकत नाही आणि त्यांना घाबरवूही शकत नाही हे त्यांच्या कधीही लक्षात येणार नाही.  

गृह मंत्रालयाने नेमलेली समिती तीन ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चैाकशी करणार आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्यांनी बुधवारी टि्वट करून ही माहिती दिली होती. गृह मंत्रालयाने केलेल्या टि्वटनुसार ईडीचे विशेष संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत. गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर याबाबत निशाणा साधला होता. डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना राजीव गांधी फाउंडेशनला पंतप्रधान सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली होती, असा आरोप भाजपने केला होता.

याविषयी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते की, संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पंतप्रधामंत्री सहायता निधी आधीच्या सरकारच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आला होता. यातून राजीव गांधी फाउंडेशनला काही रक्कम दिली होती. त्यावेळी याची जबाबदारी कोणाची होती हे स्पष्ट व्हायला हवे.   

यावर काँग्रेसने या आरोपांचे खंडन केले होते. भारत-चीन संघर्षात अपयशी ठरलेलल्या भाजपने देशातील जनतेचे लक्ष हटविण्यासाठी राजीव गांधी फाउंडेशनबाबत या आरोप केला आहे, असे काँग्रेसने म्हटले होते. सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. संचालक मंडळात राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी मंत्री पी. चिदंबरम, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com