प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे! - these are the reasons to drop Javdekar and Ravishankar from Modi Govt | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे!

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 8 जुलै 2021

बड्या मंत्र्यांना अचानक हटविल्याने मोठी चर्चा

नवी दिल्ली : रवीशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad), प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) या गेली दीड- दोन दशके भाजपचा चेहरा बनलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांसह रमेश पोखरियाल निशंक व संतोष गंगवार आदी तब्बल १३ मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच फेरबदलात बाहेरचा रस्ता दाखविला. (13 ministers droped from Modi Minisrty) 

यातील पहिल्या दोन्ही नेत्यांसह अनेक जमांना भाजप संघटनेत आगामी काळात महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असे मानले जाते. जावडेकर यांना भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात स्थान मिळू शकते किंवा प्रसंगी राज्यसभेचे प्रतिष्ठित असे सभागृह नेतेपदही त्यांना दिले जाऊ शकते असे भाजप सूत्रांनी सांगितले.

मोदी मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या चारही कॅबीनेट मंत्र्यांना का बाहेर करण्यात आले याची वेगवेगळी कारणे दिसत असली तरी त्यामागील समान धागा, कोवीडच्या दुसऱया लाटेत किंवा ट्विटर सारख्या वादासह अन्य बाबीत ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला देशविदेशांत धक्का पोहोचला तेथे तेथे मोदींनी संबंधित मंत्र्यांना वगळून कठोरपणे केमोथेरपी केली, असे राजकीय विश्लेषक मानतात.

मोदी यांची ही कार्यपध्दती गुजरातमध्ये मुख्यमंत्री असल्यापासूनची असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोना काळातील केंद्राच्या गैरव्यवस्थापनाचे विदेशातील प्रसार माध्यमांनी अक्षरशः वाभाडे काढले. त्यांना थोपविण्यात जावडेकर सपशेल कमी पडल्याचे केंद्रीय नेतृत्वाचेच नव्हे तर संघाचेही निरीक्षण आहे. विदेशी माध्यमांतील टीकेबाबत संबधित राजदूतांशी बोलणे, संबंधित वृत्तपत्रांच्या दिल्लीतील प्रतीनिधींना इशारा देणे आदी प्रयत्न जावडेकर यांनी केले. मात्र त्याचा म्हणावा तेवढा फायदा झाला नसल्याचे मत पीएमओमध्ये तयार झाले व पाहता पहाता या वादळाने जावडेकरांचाच बळी घेतला.

वाचा या बातम्या- पटोले, केदार पावसात भिजले पण राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...

वैष्णव आणि दानवे यांच पटायचं कसं?

भुजबळांच्या कोपरखळ्यांनी फडणविसांना ठसके

ट्विटर वादात प्रसाद रोज आक्रमकपणे इशारे द्यायचे. त्यांची भाषा व देहबोली अमेरिकेतही नापसंत होती असे सांगण्यात येते. निशंक यांनी प्रृती अस्वास्थ्यामुळे व सीबीएसई परीक्षेबाबत त्यांनी जो घोळ घातला हे दृश्य कारण असले तरी त्यांना हटविण्यामागील ‘अंदर की बात़' वेगळीच असल्याची उघड चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान जावडेकर व प्रसाद यांच्यासह वगळलेल्या मंत्र्यांना भाजप संघटनेत मोठी जबाबदारी देण्याचे मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी निश्चित केले आहे. जावडेकरांची ज्येष्ठता पहाता त्यांच्याकडे सर्वोच्च अशा संसदीय मंडळाचे सदस्यपद जाऊ शकते. या मंडळात सध्या तीन पदे रिक्त आहेत. भाजपमध्ये काही राष्ट्रीय महासचिव अन्य अनेक महत्वाची पदे सध्या रिक्त आहेत. तेथेही या नेत्यांची वर्णी लागू शकते. राज्यसभेतील सभागृहनेते थावरचंद गेहलोत यांंना राज्यपालपदी पाठविले गेले. त्या पदी जावडेकर यांना संधी मिळू शकते असे समजते. प्रसाद व डॉ. हर्षवर्धन हे दोघेही सध्या लोकसभेचे सदस्य आहेत. सध्या राज्यसभा सभागृह नेतेपदासाठी अमित शहा यांचे खास असलेले भूपेंद्र यादव यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे. मात्र त्यांनी ते पद नाकारल्यास जावडेकर यांच्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही असे मानले जाते. आगामी वर्षात उत्तर प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांच्या निवडमुका भाजपसाठी सर्वोच्च प्रतिष्टेचा प्रश्न ठरणार आहेत. त्या राज्यातील प्रचार मोहीमेची जबाबदारीही आता वगळलेल्या चारही माजी कॅबिनेट मंत्र्यांना देण्यात येईल अशा हालचाली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख