आरोग्यमंत्री म्हणतात, एवढे आमदार कोरोना पॉझिटिव्ह सापडले त्यांना कुठे काय झाले?

देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, आता एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
telangana senior minister tests positive for covid19
telangana senior minister tests positive for covid19

हैदराबाद : तेलंगणमचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. काही दिवसांपूर्वी ते सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे आता सरकारी पातळीवर खळबळ उडाली असून, तेलंगणच्या आरोग्यमंत्र्यांनी मात्र, आतापर्यंत एवढे आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यांना कुठे काय झाले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

तेलंगणच्या मंत्र्यांचा अंगरक्षक काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. मंत्र्यांनाही सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल आला असून, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले मंत्री हे काही दिवसांपूर्वी सरकारने घेतलेल्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आता मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत राज्यातील सत्तारुढ तेलंगण राष्ट्र समितीचे तीन आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याविषयी आरोग्यमंत्री ई. राजेंदर यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. याआधी अनेक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना कुठे काय झाले आहे? अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांनाही संसर्ग झालेला आहे. कोरोना हा जात, धर्म, सामाजिक आणि वित्तीय स्थिती पाहत नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास व्यक्तीला संसर्ग होतो. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्धची लढाई अतिशय चांगल्या पद्धतीने लढली जात आहे. मात्र, काही वक्रदृष्टी लोकांना ती दिसत नाही, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर चढविला. दिल्लीत कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही, हे अत्यंत जाणकार आणि तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे, असाही दावा शहा यांनी केला.  शहा  एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शहा म्हणाले की, दिल्ली सरकारने काही निर्णय घेतले. ते केंद्राने जनहितासाठी बदलले. मात्र महामारी निर्मूलनासाठी केंद सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये उत्तम समन्वय असून दिल्लीत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल आणि भयावह परिस्थिती निर्माण होणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com