सुशांतची हत्या की आत्महत्या उलगडा होणार? आज व्हिसेरा अहवाल - Sushantsinh Viscera Report Likely to come today From AIIMS | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतची हत्या की आत्महत्या उलगडा होणार? आज व्हिसेरा अहवाल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सुशांतसिंग राजपूतचा व्हिसेरा अहवाल मिळाल्यानंतर तो मेडिकल बोर्डाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. तसेच एम्सच्या डॉक्‍टरांचे एक पॅनेल या प्रकरणी एक बैठक करणार असून व्हिसेरा अहवालाबरोबरच त्याच्या शवविच्छेदन अहवालाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे.

मुंबई  : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा व्हिसेरा अहवाल (आज) शुक्रवारी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गूढ लवकरच उकलण्याची शक्‍यता आहे. अहवालाच्या आधारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) पुढील तपास करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे एक पथक मुंबईहून दिल्लीला पोहोचले आहे.

सुशांतसिंग राजपूतचा व्हिसेरा अहवाल मिळाल्यानंतर तो मेडिकल बोर्डाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. तसेच एम्सच्या डॉक्‍टरांचे एक पॅनेल या प्रकरणी एक बैठक करणार असून व्हिसेरा अहवालाबरोबरच त्याच्या शवविच्छेदन अहवालाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे.

रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक केल्यानंतर बॉलीवूडमधील अमली पदार्थ पुरवठ्याचे प्रकरण समोर आले आहे. अमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्याकडून एनसीबीच्या चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली आहे. रिया आणि शोविक यांच्या मोबाईल चॅटमधून अमली पदार्थासंदर्भात मोठी नावे समोर आल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली आहे. त्यानुसार एनसीबीने गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, तसेच तस्कराना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कलाकारांचा आक्षेप
सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात एनसीबीने रियाला अटक केल्यानंतर शांत असलेले बॉलीवूड कलाकार अचानक तिच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. रिया सोबतचा माध्यमांचा व्यवहार पाहून हे सर्व एकजूट झाले आहेत. बॉलीवूडमधील काही कलाकारांनी माध्यमांना एक खुले पत्र लिहिले आहे. यात त्यांनी स्वाक्षरी करून सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत रियाला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर आक्षेप नोंदविला आहे.
Edited By  - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख