#SSRSuicide : महाराष्ट्राला त्यांच्या पोलिसांचा अभिमान आहे तर त्यांनी कोणता तपास केला ! बिहारच्या डीजीपींचा सवाल - #SSRSuicide: Maharashtra is proud of their police, what investigation did they do! Question of Bihar DGP | Politics Marathi News - Sarkarnama

#SSRSuicide : महाराष्ट्राला त्यांच्या पोलिसांचा अभिमान आहे तर त्यांनी कोणता तपास केला ! बिहारच्या डीजीपींचा सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

आज बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी सुशांत रजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे : " जर महाराष्ट्र सरकारला त्यांच्या पोलिसांविषयी इतका अभिमान आहे, तर मग सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर गेल्या पन्नास दिवसात त्यांनी काय केले हे तरी आम्हाला सांगावे असा सवाल बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी आज केला आहे. 

दरम्यान, सुशांतच्या वडी#SSRSuicide : महाराष्ट्राला त्यांच्या पोलिसांचा अभिमान आहे तर त्यांनी कोणता तपास केला ! बिहारच्या डीजीपींचा सवाललांनी आज नितीशकुमार यांच्याकडे या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनत चालला असून महाराष्ट्र आणि बिहारमध्येही कलगीतुरा सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मात्र बिहारमधील भाजप, जेडीयू , राजद आणि कॉंग्रेससह सर्वच लहानमोठे पक्ष आता सुशांत आत्महत्याप्रकरणी प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

बिहार विधानसभेत भाजप आमदारांने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली असता या मागणीला भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाणारे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पाठिंबा दिला आहे. 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने तर चर्चेला उधानच आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. सुशांत आत्महत्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. 

या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे. त्यावरून मला वाटते की मुंबईने माणूसकी गमावली आहे. निदोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता सुरक्षित राहिली नाही असे त्यांनी म्हटले होते. 

आज बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी सुशांत रजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पांडे यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे,"" महाराष्ट्र सरकारने आपच्या आयपीएस अधिकाऱ्यांना जबरदस्तीने कोरोन्टाईन केले आहे. मुंबई पोलिसांविषयी महाराष्ट्र सरकारला जर इतकाच अभिमान आहे तर त्यांनी गेल्या पन्नास दिवसात कोणता तपास केला हे स्पष्ट केले पाहिजे. मुंबईने आमच्याशी संवादच थांबविला आहे. याचा अर्थ काही तरी चुकीचे घडतेय असे मला वाटते. '' 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख