#SSRSuicide : केंद्राच्या सूचनेनंतर सीबीआयने तपास सुरू केला  - #SSRSuicide: CBI launches probe after Centre's instructions | Politics Marathi News - Sarkarnama

#SSRSuicide : केंद्राच्या सूचनेनंतर सीबीआयने तपास सुरू केला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

केंद्राकडून सूचना आल्यानंतर सीबीआयने तपास करण्यास सुरवात केली आहे.

नवी दिल्ली : " अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने एफआरआर दाखल केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याची घोषणा केली होती. 

एएनआयने यासंदर्भात एक ट्विट केले असून सीबीआयने एफआयआर दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी बिहारमध्ये सर्वात प्रथम एफआयआर दाखल केला होता. सुशांतसिंहच्या वडलांनी सीबीआय तपासाची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे केली होती. त्यांना नितीशकुमार यांनी केंद्राकडे तशी शिफारस केली होती.

केंद्राकडून सूचना आल्यानंतर सीबीआयने तपास करण्यास सुरवात केली आहे. सहाजणांविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यामध्ये रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्यूअल मिरांडा, श्रुती मोदी यांचा समावेश आहे. 

सुशांत आत्महत्याप्रकरणी बिहारमध्ये सर्वच पक्षांचे नेते आक्रमक झाले असून या प्रकरणावर सर्वच पक्ष एकत्र झाले आहेत. सर्वचजणांनी सुशांतला न्याय देण्याची मागणी केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सातत्याने केला आहे. मात्र या प्रकरणावरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

बिहारचे डीजीपी जी. पांडे यांनी सुशांत रजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र सरकारने आपच्या आयपीएस अधिकाऱ्यांना जबरदस्तीने क्वारंन्टाईन केले आहे.

मुंबई पोलिसांविषयी महाराष्ट्र सरकारला जर इतकाच अभिमान आहे तर त्यांनी गेल्या पन्नास दिवसात कोणता तपास केला हे स्पष्ट केले पाहिजे. मुंबईने आमच्याशी संवादच थांबविला याचा अर्थ काही तरी चुकीचे घडतेय असेही त्यांनी म्हटले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख