आनंदवार्ता...मॉन्सून आला रे!

देशात अखेर मॉन्सूनचे आगमन आगमन झाले असून, तो आज केरळमध्ये दाखल झाला, अशी माहिती हवामान विभागाने सोमवारी दिली.
southwest monsoon arrives in kerala
southwest monsoon arrives in kerala

नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सून केरळमध्ये पोचला असून, पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. देशात सुमारे चार महिने मॉन्सून असतो, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. हवामानात झालेल्या बदलामुळे दक्षिण गजरातपर्यंत किनारपट्टी भागात 4 जूनपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

हवामान विभागाने मॉन्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून, बरोबर याच दिवशी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यात वाढ होऊन पुढील 24 तासांत चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हा पट्टा किनारपट्टीने गुजरातकडे सरकत आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून, पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल. विशेषत: 3 ते 4 जूनला उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, दमण व दीव, दादरा आणि नगर हवेली येथे मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडेल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

देशातील एकूण पडणाऱ्या पावसात या चार महिन्यात पडणाऱ्या मॉन्सूनचा वाटा 76 टक्के असतो. हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट वेदर संस्थेने 30 मे रोजी मॉन्सून भारतात दाखल झाल्याचे जाहीर केले होते. परंतु, भारतीय हवामान विभागाने त्यावेळी मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच तो आल्याचे जाहीर करण्यात आल्याचे म्हटले होते. 

ही बातमी वाचा : तुमचा मोबाइल क्रमांक अकरा अंकी होणार का ; काय आहे सत्य...
पुणे : देशभरातील मोबाइल क्रमांक हे आता अकरा अंकी होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी नुकतेच दिले होते. या वृत्ताचे खंडण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सांगितले आहे, की लॅडलाइनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी ‘0’लावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मोबाईल क्रमांक 10 अंकांऐवजी 11 अंकी होणार नसल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. पण, मोबाइल क्रमांक हे दहा अंकी का असतात, याबाबत जाणून घेऊन या. आपल्या देशातील मोबाइल क्रमांक दहा अंकी असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या आहे. तर दुसरे कारण हे सरकारची राष्ट्रीय क्रमांक योजना म्हणजे एनएनपी. जर मोबाइल क्रमांक हा फक्त एक अंकी असता तर 0 पासून ते नऊपर्यंत 10 क्रमांक वेगवेगळे होऊ शकतात, त्याचबरोबर या क्रमांकाचा वापर फक्त 10 व्यक्तीच करू शकतील. जर दोन अंकी क्रमांक असेल तर 0 पासून 99 पर्यंत फक्त 100 क्रमांक तयार होऊ शकतील. त्यांचा उपयोग फक्त शंभर व्यक्तीच करू शकतील. यामुळे मोबाइल क्रमांक दहा अंकी असतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com