सोनिया गांधींचे विश्वासू नेते डी.के. शिवकुमारांवर कर्नाटक कॉंग्रेसची जबाबदारी 

डीकेंच्या निवडीचे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
 सोनिया गांधींचे विश्वासू नेते डी.के. शिवकुमारांवर कर्नाटक कॉंग्रेसची जबाबदारी 


बेंगळूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डी.के.शिवकुमार यांची आज कर्नाटक प्रदेशा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे डीके अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. 


येडियुरप्पा सरकार येण्यापूर्वी कर्नाटकात कॉंग्रेस आणि जनता दलाचे संयुक्त सरकार सत्तेवर आले होते. कॉंग्रेसला चांगले दिवस आणण्यामध्ये डीकेंचा मोठा सहभाग होता. मात्र सत्ता स्थापन करताना आमदारांना सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. आज मावळते प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी तातडीने कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी डीके यांच्याकडे सोपविली. यावेळी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबम पक्षाचे खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीकेंच्या निवडीचे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. 

कॉंग्रेस हा कॅडरबेस असलेला पक्ष आहे. कर्नाटकातील कॉंग्रेसला अधिक मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक गावात पक्षाला नेण्याचा निर्धार डीके यांनी केला आहे. प्रदेश कॉंग्रेसचे वजनदार नेते असलेल्या डीकेवर मध्यतंरी ईडीने चौकशी केली होती. त्यांना अटकही झाली होती. मात्र ते डगमगले नाही. वेळ आली तेव्हा ते तुरूंगातही गेले. मात्र त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांची बाजू घेतली होती. त्यांना अटक व्हायला नको होती असेही त्यांनी बोलावून दाखविले होते. 

ईडीने अटक केल्यानंतर पुढे काही दिवसात त्यांची सुटका झाली पण, त्यांनी कधीही पक्षाविरोधात ब्र काढला नाही. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधीही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले होते. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद टोकाचे असले तरी डीके हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहेत. सर्व गटातटाशी त्यांचे चांगले जमते. ते स्वत:त कनकपूर विधानसभा मतदारसंघातून सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com