Sonia Gandhi discharged new delhi | Sarkarnama

सोनिया गांधी यांना डिस्चार्ज, प्रकृती स्थीर 

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सोनिया गांधी यांना रूटीन टेस्टसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सोनिया गांधी यांना रूटीन टेस्ट आणि तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज दिला त्यावेळी त्यांची प्रकृती स्थीर होती अशी माहिती सर गंगा राम हॉस्पीटल दिल्लीच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल केल्याने देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली होती. 

गांधींना गेल्या तीस जुलै रोजी सांयकाळी सात वाजता या रुग्णालयात दाखल केले होते. आज दुपारी त्यांना एक वाजता घरी सोडण्यात आले. गांधी यांच्या प्रकृतीविषयीचे बुलेटीन शुक्रवारी देण्यात आले होते.आता त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचेही या रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. 

सर गंगाराम रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी काही तासाआधी कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांच्यावर परदेशातही उपचार करण्यात आले होते. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. आता पुन्हा राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

अडवानी-जोशींना अद्याप अयोध्येचे निमंत्रण नाही

नवी दिल्ली : अयोध्येचे राममंदीर हा ज्यांच्या ध्यास राहिला त्या माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी व रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले डाॅ. मुरली मनोहर जोशी या दोन दिग्गज नेत्यांना अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर भूमीपुजनाचे निमंत्रण अद्यापही पोहोचलेले नाही.

अडवानी यांनी राममंदिराच्या मुद्द्यावर रथयात्रा काढली होती. ज्याचा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झाला. अयोध्येत तत्कालिन बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधण्याची कल्पना सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेने पुढे आणली व त्यावर आंदोलन छेडले. पुढे अडवानी यांनी देशभर रथयात्रा काढून वातावरण पेटवले. नंतर लाखो हिंदू नागरिकांनी अयोध्येत करसेवा केली. या सगळ्याची परिणती बाबरी मशिद पाडण्यात झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख