कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना - Sonia Gandhi Asks Congress Led States to take measured against Corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी आज देशातील काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून. राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi व खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आज देशातील काँग्रेसशासित Indian National Congress राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून. राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या. Sonia Gandhi Asks Congress Led States to take measured against Corona

काँग्रेसशासित राज्यांसोबत केंद्र सरकार दूजाभाव करत असून कोरोना प्रतिबंधक लस Corona Vaccine, टेस्टिंग किट, रेमडेसिव्हिर इंजेक्शन Remedisever, ऑक्सिजन पुरवठा व इतर आवश्यक उपकरणांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल दिसून येत आहे. आरोग्य Health उपकरणांच्या वितरणात केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता बाळगावी व राज्यांना पुरेशा प्रमाणात लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व विधिमंडळ पक्षनेत्यांनी यावेळी मांडल्या.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘‘कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व पावले काँग्रेसशासित राज्यांनी उचलली पाहिजेत. पण, त्याचा गरीब जनतेच्या उपजिवीकेवर विपरित परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त दुष्परिणाम सर्वसामान्य व गरिबांच्या जीवनावर होतो आहे, त्यांच्या हिताची काळजी घ्या.’’Sonia Gandhi Asks Congress Led States to take measured against Corona

काँग्रेस अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्राची भूमिका मांडताना, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात Maharashtra आघाडी सरकार कोरोना विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे. देशात सर्वांत जास्त कोरोना चाचण्या महाराष्ट्रात केल्या जात आहेत. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्र सरकारने मागणीप्रमाणे महाराष्ट्राला पुरेसा लसीचा पुरवठा केला पाहिजे. राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्राने यांचा पुरवठा तातडीने राज्याला केला पाहिजे.’’

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या या बैठकीस राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, Ashok Gehlot पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र विधिमडंळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, झारखंडचे अर्थमंत्री व झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामेश्वर सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख