काही बाॅलिवूड सेलिब्रिटीजचा 'आयएसआय'शी संबंध? 'या' नेत्याने केला आरोप

बाॅलीवूडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानी सैन्यदल आणि 'आयएसआय' शी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी केला आहे
Some Bollywood Celebrities have ISI Links Claim Bijayant Jay Panda
Some Bollywood Celebrities have ISI Links Claim Bijayant Jay Panda

नवी दिल्ली : बाॅलीवूडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानी सैन्यदल आणि 'आयएसआय' शी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. आपण यासंबंधीची काही कागदपत्रे पाहिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कुणाचे नांव जाहीर केलेले नाही. पण देशभक्त बाॅलीवूडकरांनी पाकिस्तानशी संबंध ठेवणाऱ्या 'सेलिब्रिटीज' बरोबर काम करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काही पाकिस्तानी नागरिक बाॅलीवूडच्या काही सेलिब्रिटीजशी वक्तीगत आणि व्यावसायीक संबंध राखून असून हे पाकिस्तानी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचे यापूर्वी सिद्ध झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या पाकिस्तानी नागरिकांचा आयएसआय व पाकिस्तानी सैन्य यांच्याशी संबंध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे. 

(Edited By - Amit Golwalkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com