प्रियांका गांधींबद्दल सरकारचे क्षुद्र पद्धतीचे राजकारण : शरद पवार

प्रियांका गांधी यांना केंद्र सरकारने सरकारी निवासस्थान सोडण्यास सांगितले आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
sharad pawar criticizes central government over priyanka gandhis house issue
sharad pawar criticizes central government over priyanka gandhis house issue

पुणे : प्रियांका गांधी यांच्याबद्दल हे सरकार वागले, त्या घटनेला मी क्षुद्र राजकारण असे म्हणेन. सत्ता विनयाने वापरायची असते सत्तेचा दर्प डोक्यात गेला की अशा घटना घडतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवार यांची मुलाखत घेतली असून, या बहुचर्चित मुलाखीचा प्रोमो आज सोशल माध्यमावर टाकण्यात आला. त्यामध्ये राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी वरील मत व्यक्त केले. 

राज्यातील विविध प्रश्नांवर राऊत  यांनी पवार यांना मुलाखतीत बोलते केले आहे . महाविकास आघाडीमध्ये काही राजकीय मतभेद आहेत का? तुम्ही सत्तेचे केंद्र आहात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळणार  आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे सेनेच्या कामाच्या पद्धतीनुसार काम करीत आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने सूडबुद्धीने प्रियांका गांधी यांना बंगल्यातून बाहेर काढले आहे का?  यावर हे क्षुद्रपणाचे लक्षण आहे, असे रोखठोक बोलत पवार यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे. ही मुलाखत पुढील काही दिवसांत सविस्तर प्रसारित होणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारने बजावली होती. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे  (एसपीजी) सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला हा सरकारी बंगला देण्यात येतो असा नियम आहे. त्यामुळे  या नियमाच्या आधारेच प्रियांका यांना हा बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यावरुन मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनीही सरकारला लक्ष्य केले होते. 

गांधी कुटुंबीयांना सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या सुरक्षेची आवश्यकता नाही, या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने त्यांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. लोधी इस्टेटमधील 6-बी बंगला क्रमांक- 35 मध्ये गेल्या दोन दशकांपासून प्रियांका गांधी राहत आहेत. त्यांनी आता हा बंगला सोडण्याची तयारी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com