नितीशकुमार यांचे सात मंत्री पराभूत - Seven Ministers in Nitish Kumar Cabinet Defeated | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार यांचे सात मंत्री पराभूत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असले तरी नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाला चिराग पासवान यांच्या लोजपने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. लोजपमुळे जेडीयूच्या पाच मंत्र्यांसह नितीशकुमार यांच्या कॅबिनेटमधील सात मंत्री पराभूत झाले आहेत

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असले तरी नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाला चिराग पासवान यांच्या लोजपने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. लोजपमुळे जेडीयूच्या पाच मंत्र्यांसह नितीशकुमार यांच्या कॅबिनेटमधील सात मंत्री पराभूत झाले आहेत. त्यात भाजप कोट्यातील दोन मंत्री सुरेश शर्मा आणि बृजकिशोर बिंद यांचा समावेश आहे.

जयकुमार सिंह: जेडीयूचे मातब्बर नेते आणि सहकार मंत्री जयकुमार सिंह पराभूत झाले. ते रोहतासच्या दिनारा मतदारसंघातून सतत जिंकत होते. राजदचे विजयकुमार मंडल यांनी त्यांना पराभूत केले.

सुरेशकुमार शर्मा: बिहारचे नगरविकास मंत्री सुरेश शर्मा मुझफ्फरपूर मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांना कॉंग्रेसचे विजेंद्र चौधरी यांनी पराभूत केले.

संतोषकुमार निराला: राजपूर मतदारसंघातून मंत्री संतोष कुमार निराला पराजित झाले. ते कॉंग्रेसचे विश्‍वनाथ राम यांच्याकडून पराभूत झाले.

शैलेशकुमार: बिहारचे ग्रामीण विकास मंत्री शैलेशकुमार हे जमालपूर मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांना कॉंग्रेसचे अजयकुमार सिंह यांनी पराभूत केले.

कृष्ण नंदन वर्मा: घोसी विधानसभेची जागा सोडून जहानाबाद येथे निवडणूक लढवणारे शिक्षणमंत्री कृष्णनंदन वर्मा पराभूत झाले आहेत. त्यांना राजदचे सुदय यादव यांनी पराभूत केले.

बृजकिशोर बिंद: बिहारचे उत्खन्न मंत्री बृजकिशोर बिंद हे चैनपूर मतदारसंघातून पराभूत झाले.

रामसेवक सिंह: हथुआ मतदारसंघाचे जेडीयूचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री रामसेवक सिंह हे पराभूत झाले. या ठिकाणी राजदचे राजेश सिंह विजयी झाले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख