सरोज खान यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सुशांतच्या आत्महत्येविषयी

कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन झाले असून, अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सरोज खान यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याच्याविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली होती.
saroj khans last instagram post was about sushant singh rajput suicide
saroj khans last instagram post was about sushant singh rajput suicide

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (वय 72) यांचे मुंबईत बांद्रा येथील गुरूनानक रूग्णालयात मध्यरात्री निधन झाले. सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवूडला आणखी धक्का बसला आहे. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, सुशांतिह राजपूत यांच्या आता सरोज खान यांच्या मृत्यू झाला आहे. योगायोगाने  सरोज खान यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्टही सुशांतसिंह राजपूत याच्याविषयी होती. 

सरोज खान यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली होती. ही त्यांची शेवटची पोस्ट ठरली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी कधीही तुझ्यासोबत काम केले नाही परंतु, आपण अनेक वेळा भेटलो होतो. तुझ्या आयुष्यात नेमके बिघडले? तू टोकाचे पाऊल उचलल्याने मला धक्का बसला आहे. तू वडीलधाऱ्यांशी बोलायले हवे होतेस. त्यांनी तुला मदत करुन आनंदी बनवले असते. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो. तुझे वडील आणि बहिणी कोणत्या परिस्थितीतून जात असतील, याची मला कल्पनाही करवत नाही. तू मला सर्व चित्रपटांत आवडला होतास आणि पुढेही आम्ही तुझ्यावर प्रेम करीत राहू. 

सरोज खान यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला त्या उत्तम प्रतिसाद देत होत्या. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत होती. सरोज खान यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी मुंबईत झाला होता. सरोज खान यांचे नाव निर्मला नागपाल होते.  भारत-पाकिस्तान विभाजनानंतर त्या भारतात आल्या होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम केले होते. त्यांनी आपले नृत्यगुरू सोहनलाल यांच्याशी लग्न केले होते.

त्यांनी चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून 1986 पासून कामास सुरवात केली. 2019 पर्यंत त्या चित्रपट क्षेत्रात सक्रिय होत्या. चालबाज, नगीना, तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी कोरियाग्राफी केली होती.कलंक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. कलंक या चित्रपटातील  'तबाह हो गए... ' यासाठी कोरियाग्राफ केले होते. यात माधुरी दिक्षित नृत्य करताना दिसत आहे.

आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते. दिल धक धक करने लगा, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, ना जाने कहा से आई है, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले होते. 

अनेक कलाकारांना त्यांनी शिकवलेल्या नृत्यामुळे यश मिळाले. त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सर्वसामान्य, रसिक, सेलिब्रेटी यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com