पायलट यांना पाठिंबा देणे पडले महागात; दोन मंत्र्यांनाही डच्चू

राजस्थानमधील राजकीय वादळ अखेर शमले असून, कोणत्याही चर्चेला सचिन पायलट बधत नसल्याचे पाहून अखेर पक्षाने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे.
sachin pilot loyalists vishvendra singh and ramesh meena removed from the state cabinet
sachin pilot loyalists vishvendra singh and ramesh meena removed from the state cabinet

भोपाळ : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज दिली. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट समर्थकांना या फसलेल्या बंडाची किंमत मोजावी लागली आहे. पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 

पायलट यांचे समर्थक विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीना यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदावरुन पायलट यांची हकालपट्टी करण्यात  आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत ते तातडीने राज्यपाल कलराज मिश्र यांना भेटले. तेथेच त्यांनी विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीना यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला.

'सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र, पराभूत केले जाऊ शकत नाही,' असे पायलट यांनी हकालपट्टीनंतर ट्विटरवर म्हटले आहे. यावर पायलट यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू घेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले आहे. गेहलोत यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन दूर केले आहे, याचा सूड ते गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवून घेतील, असे एका पायलट समर्थकाने म्हटले आहे. 

काँग्रेस पक्षाने पायलट यांच्याकडील खाती काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. काही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात जो सामना रंगला आहे. पायलट दोन दिवस झाले दिल्लीत आहेत पण, ते कोठे आहेत हे समजत नाही. ते नेमके काय करणार आहेत. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते पण, त्याबाबतही अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही. गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करून पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी आतापर्यंत तसा तीनवेळा प्रयत्न केला पण, त्यांना यश आले नाही. 

आज राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक जयपूर येथील हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षविरोधी कारवाया करणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. 

 Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com