मध्य प्रदेश सरकार पुन्हा संकटात? मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप आमदार नाराज

मध्य प्रदेशमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर या आठवड्यात झाला. या विस्तारात स्थान न मिळालेल्या नाराजांनी सरकारविरोधात आता मोहीम सुरु केली आहे.
resentment in bjp mlas over madhya pradesh cabinet expansion
resentment in bjp mlas over madhya pradesh cabinet expansion

भोपाळ : मध्य प्रदेशचा बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर या आठवड्यात झाला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळ विस्तारात घसघशीत माप दिले आहे. मात्र, या विस्तारात निष्ठावंत भाजप आमदारांना डावलण्यात आल्याने नाराजी निर्माण झाली आहे. एका भाजप आमदाराने तर मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून थेट नाराजी कळविली आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार अजय विष्णोई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ते पाटन मतदारसंघातील आमदार आहेत. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, माजी मंत्रीही आहेत. ते 1983 मध्ये मध्य भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यावेळी या संघटनेत शिवराजसिंह चौहान हे सचिव होते.  मुख्यमंत्र्यांच्या अडचणी मी समजू शकतो परंतु, येथील जनता समजून घेऊन शकत नाही, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांचा रोख खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी म्हटले आहे की, जबलपूर आणि रेवा विभागातील नागरिकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांनीच आता येथील पालकमंत्री होऊन जनतेची समूजत घालावी. काँग्रेस नेते दिग्विजयसिंह मुख्यमंत्री असताना ते जबलपूरचे पालकमंत्री होते. 

पक्षाची प्रतिमा डागाळली गेल्याचे विष्णोई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विस्तारासाठी दिल्ली दौरा करावे लागणे हे राज्यात कधीही घडले नव्हते, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, भाजपचे आणखी एक आमदार रमेश मेंडोला यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मेंडोला हे भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय आहेत. 

राज्यात तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिंदे आपल्या गटासह भाजपमध्ये गेल्याने वर्षभरापूर्वीचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. नंतर भाजपने येथे सरकार बनवले. त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरू असल्याने शिवराजसिंह चौहान यांच्यासह तीनच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी यांनी दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची राजकीय गणित जुळत नसल्याने विस्तार आणखी लांबणीवर पडला होता. अखेर यासाठी या आठवड्यातील मुहूर्त निघाला आणि तो पार पडला आहे. 

आता या विस्तारात चौहान यांना शिंदे समर्थक आमदारांच्या पारड्यात घसघशीत माप टाकावे लागले. साहजिकच यामुळे भाजपचे निष्ठावंत आमदार नाराज झाले. शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. पक्ष नेतृत्वाच्या दबावामुळे स्थानिक नेते काही बोलत नसल्याचे चित्र आहे. मात्र, ही खदखद  मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता बाहेर पडू लागली आहे. चौहान यांना काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार आणि राज्यातील भाजप नेते यांच्यात समतोल साधण्याची कसरत करावी लागली आहे. राज्यातील जातीय समीकरणांकडेही भाजपला विशेष लक्ष द्यावे लागले आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराचा थेट परिणाम प्रस्तावित 24 विधानसभा पोटनिवडणुकांवर होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com