बंडखोर आमदार म्हणतात, "जयपूरला परतणार आणि अधिवेशनात सहभागीही होणार !''  - The rebel MLA says, "I will return to Jaipur and participate in the convention!" | Politics Marathi News - Sarkarnama

बंडखोर आमदार म्हणतात, "जयपूरला परतणार आणि अधिवेशनात सहभागीही होणार !'' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जुलै 2020

गेहलोत हे पायलट यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जयपूर : राजस्थानातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला असून कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला आहे. 

पायलट यांच्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अडचणीत सापडले आहे. पायलट यांना 18 आमदारांचा पाठिंबा आहे. असे असले तरी गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. आता याची परीक्षा येत्या 14 ऑगस्टरोजी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी तारीख देण्यावरून राज्यपाल कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री गेहलोत यांच्यात सामना रंगला होता.

गेहलोत हे राज्यपालांविरोधात आक्रमक झाले होते. शेवटी नाट्यमय घडामोडीनंतर राज्यपालांनी अधिवेशन बोलविण्यासाठी तारीख दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी हा दोघांमधील वाद मिटला आहे. 

पायलट यांचे समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या भाजपचे शासन असलेल्या हरिवानात आहे. तर गेहलोतांचे आमदार राजस्थानातील हॉटेलात आहे. बंडखोर आमदारांना आता आपल्या राज्यात म्हणजे जयपूरला परतायचे असून त्यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीने एका बंडखोर आमदाराशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हो आम्हाला जयपूरला जायचे आहे आणि अधिवेशनातही सहभागी व्हायचे आहे. मात्र केव्हा परतणार याबाबत त्यांनी काही स्पष्ट केले नाही. कालरात्री उशीरा राज्यपालांना अधिवेशन बोलविण्यास परवानगी दिल्यानंतर दोन्ही गट खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. 

गेहलोत सरकारची खरी परीक्षा आता 14 ऑगस्टरोजी होणार आहे. जर ते का बहुमत सिद्ध करू शकले तर ते अधिक आक्रमक होतील. पायलट यांच्या तीन समर्थक आमदारांचा आपल्या पाठिंबा असल्याचा दावा गेहलोत गटाने केला आहे. काही आमदारांना आपल्याकडे परतायचे असल्याचा दावाही या गटाने काही दिवसापूर्वी केला होता.

गेहलोत हे पायलट यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांची गद्दार म्हणूस ते संभावना करीत आहेत. कॉंग्रेस अंतर्गत वाद उफाळून आल्याने तेथील सरकार अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे भाजप या सर्व घडामोडीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. आता 14 ऑगस्टकडेच राजस्थानसह देशाचे लक्ष असेल कारण त्यादिवशी काय होते हे महत्त्वाचे आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख