नवी दिल्ली : ‘‘रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेत पैसा टाकण्याऐवजी केंद्र सरकारला कर्तव्यपालन करण्यास आणि राजकोषीय उपाययोजना करण्यास सांगावे,’’ असा खोचक सल्ला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिला.
सावधान! कोरोनावरील या औषधाचे आहेत अनेक धोके #Sarkarnama #Corona #Hydroxychloroquinehttps://t.co/GcSdG0qCTh
— MySarkarnama (@MySarkarnama) May 23, 2020
ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रिझर्व्ह बॅंकेला सल्ला देतानाच केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीकास्त्र सोडले. एकीकडे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर मागणीच नसल्याचे आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासदर नकारात्मक राहण्याची शक्यता असल्याचे स्वतः सांगत आहेत.
असे असताना त्यांनी अर्थव्यवस्थेत आणखी पैसा ओतण्याची गरज काय, सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे आणि राजकोषीय उपाययोजना करावी, असे ते का सांगत नाहीत, असा सवाल चिदंबरम यांनी केला.
रिझर्व्ह बॅंकेने काल रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि व्याजदराच्या कपातीची घोषणा करताना कोरोना संकटामुळे ४० वर्षांत प्रथमच नकारात्मक विकासदर राहण्याची चिंता व्यक्त केली होती. त्यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिव्हर्स रेपो रेट ४.४ टक्क्यांवरून चार टक्के केला आहे.
यावरूनही चिदंबरम यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेच्या या वक्तव्यानंतरही पंतप्रधान कार्यालय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अशा आर्थिक पॅकेजवर जे प्रत्यक्षात देशांतर्गत ढोबळ उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आर्थिक मदतीचे आहेत, त्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

