राज्यसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी राजीव सातव यांची नोटीस - Rajiv Satav Gives Zero Hour Notice About Maratha Reservation | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी राजीव सातव यांची नोटीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा व्हावी, यासाठी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी 'झिरो अवर नोटीस' दिली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा व्हावी, यासाठी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी 'झिरो अवर नोटीस' दिली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कायद्यांतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यावर आता पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी नोकरभरतीत आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशात मराठा समाजाला आरक्षण राहणार नाही, हे पण स्पष्ट झाले आहे. फक्त पदव्यत्तुर वैद्यकीय प्रवेशासाठी हे आरक्षण सुरू राहणार आहे.  2020-21 या शैक्षणिक वर्षात या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्यावरुन राजकीय वादळ निर्माण झाले आहे. 

उच्च न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का अडलं, यासाठी राज्य सरकारच जबाबदार असून त्यांनी मराठा आरक्षण योग्य प्रकारे न्यायालयात मांडलेले नाही. ज्यांनी ड्राफ्ट तयार केला त्यांच्यासह ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मांडले, त्या दोघांनीही याचे उत्तर दयायला हवे. सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन आपल नेमकं काय चुकलं याचे आत्मचिंतन करायला हवे. पुर्वी चहापानासाठी एकत्र येता मग मराठा समाजासाठी का एकत्र येत नाही, असा प्रश्न कोल्हापरचे छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.  

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आरक्षणाबाबत सर्व बाबी स्पष्ट आहेत. पूर्वीच्या सरकारने गायकवाड आयोगाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले होते. मग आत्ता सर्वोच्च न्यायालयात का अडलं. यासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण योग्य प्रकारे का मांडले गेले नाही. ज्यांनी आरक्षणाचा ड्राफ्ट तयार केला त्यांनी आणि ज्यांनी मांडले त्या दोघांनीही उत्तर द्यायला पाहिजे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन नेमकं काय चुकलंय याचे चिंतन करावे. त्यानंतरच पुढील रूपरेषा ठरविली पाहिजे. पूर्वी चहापानासाठी एकत्र येत होतो. मग मराठा समाजासाठी का एकत्र येऊ शकत नाहीत, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

आरक्षणाला स्थगिती मिळाली हा निश्चित धक्का आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून अनेकांना नियुक्त्या मिळाल्या आहेत. तसेच शैक्षणिक सुविधाही मिळाल्या आहेत. पण आता सगळ्यांचा तोटा झाला आहे. पुढे काय करायचे हे महत्वाचे आहे. आता ही न्यायालयीन लढाई असून सर्व खासदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख