सचिन पायलट व १८ बंडखोर आमदारांना काँग्रेसची नोटीस

सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानंतर सोमवारी राजस्थान काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पायलट यांच्यासह १८ आमदार अनुपस्थित होते. त्यासाठी या सर्वांना काँग्रेसने नोटीस बजावली आहे
Rajasthan Congress Servers Notices to Sachin Pilot and his Supporter MLA's
Rajasthan Congress Servers Notices to Sachin Pilot and his Supporter MLA's

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकवणारे सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांना प्रदेश काँग्रेसने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटिशींचे उत्तर येत्या दोन दिवसांत न दिल्यास ते काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्य नाहीत, असे गृहित धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड केलेले नेते सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केले आहे.

पायलट यांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड केल्यानंतर सोमवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पायलट यांच्यासह १८ आमदार अनुपस्थित होते. हे सर्वजण त्यावेळी दिल्लीजवळील एका पंचतारांकित हाॅटेलात वास्तव्यास होते. या बैठकी अनुपस्थित राहिल्याबद्दल या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्याचे काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितले. काही आमदारांच्या घरांवर या नोटिसा चिकटविण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

काल राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्याचे आभार मानले असून, सर्वांना अभिवादन केले आहे. पक्षाच्या जयपूरमधील राज्य मुख्यालयावरील पायलट यांच्या नावाची पाटीही काढून टाकण्यात आली आहे. पायलट यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पायलट यांनी 'सत्याला त्रास दिला जाऊ शकतो परंतु पराभूत करता येत नाही,' असे ट्विट केले होते.

भाजपची आज बैठक

         वसुंधरा राजे

दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना भारतीय जनता पक्षाने आज जयपूर येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत त्या  भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.  सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसमध्ये अस्थवस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

भाजपच्या केंद्र पातळीवर याबाबत चर्चा सुरू असून काल भाजपचे वरिष्ठ नेता ओम माथुर हे जयपूर येथे पोहचले आहेत. आजच्या बैठकीत ते सहभागी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांची मंगळवारी (ता. १४ जुलै) उपमुख्यमंत्री, तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पायलट यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासारा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद सिंह हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांच्या मागणीनुसार पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com