नियमित रेल्वेसेवेसाठी स्वातंत्र्यदिनानंतरच मुहूर्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता रेल्वे सेवा नियमितपणे सुरु करण्यासाठी स्वातंत्र्यादिनानंतर मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
raillways will resume service after 15 august says sources
raillways will resume service after 15 august says sources

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला होता. यामुळे नियमित रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या श्रमिक रेल्वे गाड्यांचा अपवाद होता. आता रेल्वेने नुकत्याच काढलेल्या नव्या आदेशानुसार 14 एप्रिलपर्यंत आरक्षित केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे परत परत करण्यात येणार आहेत. याचबरोबर नियमित प्रवासी गाड्या 14 ऑगस्टपर्यंत न चालवण्याचे संकेतही रेल्वेने दिले आहेत. 

कोरोना लॉकडाऊन 24 मार्चला सुरू झाल्यापासून रेल्वेने नियमित गाड्या सुरू करण्याबाबत अनेक उलटसुलट आदेश काढले. रेल्वे 12 मेपासून 230 मेल आणि एक्स्प्रेस विशेष गाड्या म्हणून चालवत आहे. मात्र, नियमित सेवा सध्याच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत बंद आहेत. देशभरातील कोरोनाचा कहर जुलैमध्ये आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. तसा स्पष्ट इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनीही दिला आहे. हे पाहता नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्यास केंद्र सरकारने नकार कायम ठेवला आहे. विशेष गाड्यांच्याच फेऱ्या वाढविण्यात येतील, असे संकेत आहेत. 

दिल्लीतील रेल्वे मुख्यालयातून सर्व विभागांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे की, 14 एप्रिल किंवा त्या आधी आरक्षित केलेली सर्व तिकिटे रद्द करण्यात यावीत. कोरोना काळात 120 दिवस अगोदर तिकिटांचे आरक्षण करण्यास रेल्वेने परवानगी दिली होती. हे लक्षात घेतले तर 14 ऑगस्टपर्यंत रेल्वे गाड्या  चालवण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, या काळात वेगवेगळ्या नावाखाली विशेष दर आकारून ठराविक शहरांच्या गाड्या वाढवल्या जातील, असेही  सूत्रांकडून समजते. 

गेले तीन महिने प्रवासी सेवा संपूर्ण मालवाहतूक अंशतः बंद असल्यामुळे रेल्वेने आता खर्चात कपातीचे उपाय सुरू केले आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेचे उत्पन्न किमान 58 ते 60 टक्क्यांनी घटल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे अनावश्यक खर्च वाचवा, असे सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांमधील व्यवस्थापकांना बजावण्यात आले आहे.

दिल्लीसह अनेक ठिकाणी निवृत्त झालेले अक्षरशः शेकडो रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकता आणि इतर कारणे पुढे करून निवृत्तीनंतरही पोसले जात होते. त्यांना नारळ देऊन कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यास रेल्वेने सुरुवात केली आहे आहे. वायफळ खर्च कमी करणे, फायलींऐवजी संगणकांवर जास्तीत जास्त कामे करणे, यासारखे उपायही दिल्लीपासून सुरू झाले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com