देशाची अर्थव्यवस्था भंगारपेक्षा जरा बरी : राहुल गांधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असून, अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
rahul gandhi targets narendra modi over declining economic situation
rahul gandhi targets narendra modi over declining economic situation

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था भंगारपेक्षा थोडी बरी म्हणावी लागेल अशी झाली आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. एक तृतीयांश लघुउद्योग कायमस्वरूपी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने सरकारने त्यांनी तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘मूडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचे मानांकन कमी केले आहे. भारताचे मानांकन ‘बीएए २’वरुन आता ‘बीएए ३’ करण्यात आले आहे. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

‘मूडीज’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय अर्थव्यवस्थेचा भंगारच्या तुलनेत किंचित वरचे स्थान दिले आहे. गरीब आणि एमएसएमई क्षेत्राला मदत न केल्यामुळे पुढील काळात स्थिती आणखी गंभीर होईल. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगांना तातडीने आर्थिक मदत करण्यात टाळाटाळ करणे हा सरकारचा गुन्हा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 24 जागांसाठी 19 जूनला मतदान होईल असे जाहीर केले असून, यातील 18 जागांवरील मतदान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आले होते. यामुळे देश पातळीवर राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत आंध्र प्रदेश 4 जागा, गुजरात 4, झारखंड 2, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन, मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.याचबरोबर जून आणि जुलैमध्ये निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या जागी नव्या सहा सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे. यात कर्नाटकातील चार आणि अरुणाचल व मिझोराममधील प्रत्येकी एक जागा आहे.  मतमोजणी 19 जूनला सायंकाळी होणार आहे. 

पुणे : दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी पक्षाने मोठा झटका दिला असून त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आदेश गुप्ता यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी . त्यांना हटविताना कोणतेही कारण दिले नाही आणि तसे कारणही समजू शकले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com