rahul gandhi slams modi government over increasing import from china | Sarkarnama

भाजप म्हणते 'मेक इन इंडिया' अन् करते 'बाय फ्रॉम चायना' : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या गोष्टींवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात चीनमधून होणारी आयात वाढल्याचा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमधील गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यावरुन आता देशात चिनी गोष्टींवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मोहिमेला लक्ष्य केले आहे.

भाजपचे म्हणायला मेक इन इंडिया आणि करायला बाय फ्रॉम चायना, असा टोला त्यांनी लगावला आहे. मोदी सरकारच्या काळात चीनमधून होणारी आयात वाढल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर मोदी सरकारवर निशाणा साधला. भाजप म्हणते मेक इन इंडिया करा. याचवेळी भाजप म्हणते 'मेक इन इंडिया', करते 'बाय फ्रॉम चायना', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधींनी आधीचे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार आणि आताच्या मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात चीनमधून होणाऱ्या निर्यातीचा आलेख शेयर केला आहे. 

या आलेखात 2008 ते 2014 या काळात चीनमधून होणारी आयात 14 टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसते. मात्र, भाजप सरकारच्या काळात चीनमधून होणारी आयात 18 टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही दिसते. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना 2008 मध्ये चीनमधून होणारी आयात 12 टक्के होती. ती 2012 मध्ये 14 टक्क्यांवर गेली आणि 2014 मध्ये ती पुन्हा 13 टक्क्यांवर घसरल्याचे दिसते. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात चीनमधून होणारी निर्यात वाढत गेल्याचे दिसत आहे. चीनमधून होणारी निर्यात 2015 मध्ये 13 वरुन 14 टक्के, 2016 मध्ये 16 टक्के, 2017 मध्ये 17 टक्के आणि 2018 मध्ये 18 टक्क्यांवर पोचली. 

टिकटॉकवरील बंदी तात्पुरती की कायमस्वरुपी ?

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकप्रिय टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यातील टिकटॉकवरील बंदी तात्पुरती की कायमस्वरुपी असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख