प्रियंका गांधी लखनौला स्वत:च्या बंगल्यात शिफ्ट होणार ! 

दिल्लीतील मोदी स्ट्रीटवर असलेला बंगला प्रियंका गांधी यांना खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या 23 वर्षापासून त्या बंगल्यात राहात होत्या.
प्रियंका गांधी लखनौला स्वत:च्या बंगल्यात शिफ्ट होणार ! 

नवी दिल्ली : कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी डी.के.शिवकुमार यांची निवड होताच त्यांना पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताना त्या भाजपवरच घसरल्या आणि जोरदार हल्लाबोल केला. 

माझ्यासह सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमोर परीक्षा आहे ती संघर्ष करण्याची. भारतीय लोकशाही, न्याय आणि राष्ट्राच्या आत्म्यासाठी पूर्ण ताकदीने आपणास लढावे लागेल. भाजप सरकार अन्याय करीत आहे त्यांच्यासमोर कदापी झुकणार नाही. विरोधीपक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले जात असले तरी घाबरून चालणार नाही. भाजपविरोधात प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या ताकदीने लढावे लागेल. प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांने खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम केले पाहिजे. 

कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार हे कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत ते भाजपविरोधात नेहमीच दोन हात करतात. तुरूंगात टाकले तरी ते कधी डगमगले नाहीत. 

दिल्लीतील मोदी स्ट्रीटवर असलेला बंगला प्रियंका गांधी यांना खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या 23 वर्षापासून त्या बंगल्यात राहात होत्या. त्यांना बंगला खाली करण्याचा आदेश दिला असला तरी त्या राजधानी दिल्लीतच राहतील असे वाटत होते. पण, त्या आता लखनौमध्ये शिप्ट होणार असल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी यांचा स्वत:चा बंगला आहे. 
 
पक्षाविरोधात ब्र काढला नाही.
बेंगळूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डी.के.शिवकुमार यांची आज कर्नाटक प्रदेशा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे डीके अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. 

ईडीने अटक केल्यानंतर पुढे काही दिवसात त्यांची सुटका झाली पण, त्यांनी कधीही पक्षाविरोधात ब्र काढला नाही. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधीही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले होते. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद टोकाचे असले तरी डीके हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहेत. सर्व गटातटाशी त्यांचे चांगले जमते. ते स्वत:त कनकपूर विधानसभा मतदारसंघातून सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com