पंतप्रधान मोदींच्या पॅकेजमुळे देशाला नवी ताकद : स्मृती इराणी

व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीत आज स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी जाहीर केलेलेपॅकेज देशाला ताकद देईल, असा विश्वास इराणी यांनी व्यक्त केला.
prime minister package will give new power to country says smriti irani
prime minister package will give new power to country says smriti irani

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमुळे भारताला नवीन संधी मिळण्यासोबत एक नवी ताकदही मिळेल, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.

भाजपच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलींचे देशभर आयोजन केले आहे. आज या रॅलीत स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मोदी पहिल्यांदा 2014 मध्ये पंतप्रधान बनले आणि त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा त्यांना जनादेश मिळाला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही सहा वर्षे भारताच्या प्रगतीची ठरली आहेत. देशात 60 वर्षांपासून असलेले अनेक प्रश्न मोदींनी सोडविले आहेत. 

कोरोना संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन उपलब्ध करुन दिले आहे. याचबरोबर गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडरही देण्यात आले.देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प मोदींनी केला आहे. हा संकल्प पूर्ण होणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात 11 कोटींहून अधिक जणांना जेवण दिले आहेत. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते, असे इराणी म्हणाल्या. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १६ व १७ जूनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. मोदी हे  १७ जूनला (बुधवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांसाठी वेगळी नियमावली व उपाययोजना करण्याबाबत निर्णय होणार आहे. देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ४१५ नवे रूग्ण सापडले आहेत आणि ३८६ जणांचा बळी गेला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ तर मृतांची संख्या ८ हजार ८८४ झाली आहे. अमेरिका, ब्राझील व रशियानंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. दिल्ली आणि मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली व तमिळनाडू या तीन राज्यांत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com