मोदींची मोठी घोषणा : गरीबांना आता नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात अनलॉक-2 मधील आव्हानांचा आढावा घेत गरीबांसाठी महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
prime minister narendra modi said garib kalyan yojana extended till november
prime minister narendra modi said garib kalyan yojana extended till november

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. याअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत धान्य देणे कायम ठेवले जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत 1.75 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. 

मोदी यांनी आज देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी अनलॉक-2 मधील आव्हानांचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, आपण आता अनलॉक-1 मधून अनलॉक-2 मध्ये जात आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे.  वेळेत घेतलेले निर्णय आणि उपाययोजना यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनलॉक 2.0 मध्ये जातना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आता थंडी, ताप, खोकल्याचा हंगाम सुरू होत आहे. या परिस्थितीत मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी स्वत;ची काळजी घ्यावी. अनलॉक 1 मध्ये अनेक जण बेफिकीर झाल्याचे दिसून आले. आता त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहेत. यामुळे मास्क इतर साधने वापरून तुमचे संरक्षण तुम्हीच करा. 

मागील तीन महिन्यांत 20 कोटी गरीब नागरिकांच्या खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. याचबरोबर 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू राहील. यातून देशातील सुमारे 80 कोटी नागरिकांना फायदा होईल, असे मोदी यांनी सांगितले.  

गरीब, गरजूंना मोफत अन्नधान्य सरकार देत आहे. याचे पहिले श्रेय शेतकरी आणि दुसरे श्रेय इमानदार करदात्यांना जाते. शेतकऱ्यांनी अन्न भांडार खुले केल्याने आज गरीब पोटभर जेवत आहे. इमानदार करदात्यांनी देशाच्या तिजोरीत भर टाकल्याने देशातील गरीब आता या परिस्थितीशी लढत आहे. तुमच्या परिश्रम आणि समर्पणामुळे देश गरीबांना मदत करु शकला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com