नाशिकच्या मृत्यू तांडवाने पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री शहा हळहळले

नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
 Narendra Modi,Amit Shah .jpg
Narendra Modi,Amit Shah .jpg

नवी दिल्ली : नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. नाशिकमध्ये आज ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात टँकरमधून ऑक्सिजन गळती होण्याची धक्कादायक घटना घडली. 

राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांना प्राण गमावावे लागल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. शाह यांनी ट्विटरवरुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या घटने संदर्भात मोदींनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ''नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत लोकांना प्राण गमावावे लागल्याने मला प्रचंड दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सद्गभावना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,'' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

या घटने संदर्भात अमित शहा यांनीही ट्वीट केले आहे, ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ''नाशिकमधील रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. या अपघातामध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्या कधीही न भरुन येणाऱ्या नुकसानीसाठी मी सद्भावना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,'' असे शाह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रुग्णालयात दिडशेहून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यात २३ रुग्ण लाईफ सपोर्टीव्ह (व्हेंटीलेटर) उपचारावर होते. सकाळी अकराला रुग्णालयाच्या केंद्रीत ऑक्सीजन पुरवठ्यासाठी बसविलेल्या टाकीत ऑक्सीजन रिफीलींग करण्यासाठी ड्युरो टॅंक आला होता. फिलींगच्या कॅाकला पाईप जोडल्यानंतर प्रेशर कॅाक सुरु करण्यात आला. यावेळी टाकीला व टॅंकरच्या पाईपला कनेक्ट करणारा व्हॅाल्वचे थ्रेड व्यवस्थित नव्हते. थ्रेड ढिले असल्याने ऑक्सीजनच्या उच्च दाबामुळे पाईप नीट कनेक्ट न झाल्याने टाकीत न जाता बाहेर पसरला. फिलींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गोंधळामुळे ही त्रुटी झाली असावी, असा कयास आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com