सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी होणार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू असून, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची या प्रकरणी चौकशी होणार आहे.
police will interrogate director shekhar kappor in sushant singh rajput suicide case
police will interrogate director shekhar kappor in sushant singh rajput suicide case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. आता या प्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी केली जाणार आहे. सुशांत हा आठ वर्षांपूर्वी शेखर कपूर यांच्या चित्रपटात काम करणार होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत एकूण 28 जणांचे जबाब नोंदविले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर कपूर यांच्या पाणी चित्रपटात सुशांत हा मुख्य भूमिका करणार होता. हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी गुंडाळण्यात आला होता. या चित्रपटाकडून सुशांतला खूप अपेक्षा होता. मात्र, तो गुंडाळण्यात आल्याने त्याच्यावर मानसिक आघात झाला होता. याबाबत आता पोलीस शेखर कपूर यांची चौकशी करणार आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येमागील सर्व कारणे पडताळली जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 28 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी काही नवीन माहिती समोर आल्याने सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच मिळाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. 

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालालात त्याचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्‍टरांनी स्वाक्षरी केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत. दरम्यान, सुशांतने कुठले विषारी द्रव्य किंवा पदार्थ खाल्ला होता का याचीही तपासणी करण्यात आली होती. प्रयोगशाळेकडून त्याबाबतचा अहवाल मिळाला असून, त्याने कोणताही विषारी पदार्थ मृत्यूआधी खाल्लेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहितीही  सूत्रांनी दिली आहे. सुशांत याच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उलगडले नसून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, अंदाज वर्तविले जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरविणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com