चकमकीआधीच गँगस्टर दुबेची चकमक होईल, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात

कानपूरनजीक चकमकीत गँगस्टर विकास दुबे मारला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, चकमक होण्याआधीच विकास दुबेला मारला जाईल, अशी भीती व्यक्त करणारी याचिका दाखल झाली होती.
petition in supreme court over vikas dubey security filed before enocunter
petition in supreme court over vikas dubey security filed before enocunter

लखनौ : कानपूरनजीक आज सकाळी झालेल्या चकमकीत गँगस्टर विकास दुबे हा ठार झाला असून, यात चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. मात्र, विकास दुबे याला काल पकडण्यात आल्यानंतर त्याला चकमकीत मारले जाईल, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे या विकास दुबेला पुरेशी सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करणारी याचिका काल रात्रीच सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. 

वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. विकास दुबेला पोलीस चकमकीत ठार मारण्याची भीती त्यांनी याचिकेत व्यक्त केली होती. याचबरोबर पोलिसांनी आठवडाभरात दुबेच्या पाच साथीदारांना चकमकीत ठार मारले असून, याची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करावी, असेही उपाध्याय यांनी म्हटले होते. दुबेचे घरही पाडण्यात आले असून, याबाबत कानपूर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.  

या चकमकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. पोलिसांच्या निवदेनानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन जात होता. कानपूरनजीक पोचल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर अचानक गाई आणि म्हशींचा कळप आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेशुद्ध झाले. मात्र, विकास दुबे हा शुद्धित होता. तो पोलिसांचे पिस्तुल घेऊन पलायन केले. 

पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.  

बॉलिवूडमधील थरारक चित्रपटाप्रमाणे आज सकाळी झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. या चकमकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास दुबे आणि राजकीय नेत्यांचे असलेले संबध लपविण्यासाठीच चकमकीत विकास दुबेला मारण्यात आले, असा दावाही करण्यात येत आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

उत्तर प्रदेशात ८ पोलिसांची हत्या करुन फरारी झालेला व काल उज्जैनमध्ये पकडला गेलेला गँगस्टर विकास आज सकाळी कानपूरजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला. उज्जैनहून त्याला घेऊन येणाऱ्या पोलिस वाहनांच्या ताफ्यातली एक मोटार उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केले.

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून काल  सकाळी अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दहा पथके तयार केली होती. गेल्या आठ दिवसांतील अनेक घडामोडींनंतर विकास दुबे अखेर मध्यप्रदेश पोलिसांच्या हाती लागला होता. एका पोलिसाचे पिस्तुल हिसकावून विकास दुबेने पळण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

आज सकाळी त्याला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली एक जीप उलटली. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी चकमक घडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com