Pakistan Moved Additional Troops on LOC near Pak Occupied Kashmir | Sarkarnama

पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सैन्य तैनात

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

भारत व चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तसेच गिलगीट-बालिस्तान येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले वीस हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त आहे. उत्तर लडाखमधील नियंत्रण रेषेपलीकडे चीनचे सैन्य तैनात आहे.

नवी दिल्ली : भारत व चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तसेच गिलगीट-बालिस्तान येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले वीस हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त आहे. उत्तर लडाखमधील नियंत्रण रेषेपलीकडे चीनचे सैन्य तैनात आहे. भारताने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकनंतर जे सैन्य पाकिस्तानने तैनात केले होते, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आता सैन्य तैनात करण्यात आले आहे. 

दुसऱ्या बाजूला चीनने अल् बद्र या अतिरेकी संघटनेशी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवण्याबाबत चर्चा सुरु केली असल्याचीही गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. भारता विरुद्ध चीन व पाकिस्तान एकत्र येऊन कारवाया करीत आहेत, याला यामुळे पुष्टी मिळते आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्ताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपली रडार्सही पूर्ण क्षमतेने सिद्ध ठेवली आहेत. 

ही स्थिती खरी असेल तर भारताला एकाच वेळी सीमेपलीकडील दोन शत्रूंशी लढावे लागेल व त्याच वेळी काश्मीरमधील अतिरेक्यांचाही मुकाबला करावा लागेल, अशी भीती सामरिक तज्ज्ञांना वाटते आहे. ही स्थिती लवकरच येऊ शकते, असेही या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत पाकिस्तान व चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख