Obama had erased apartheid by giving a beer party! | Sarkarnama

ओबामांनी बीअर पार्टी देऊन मिटविला होता वर्णभेदाचा वाद ! 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 2 जून 2020

वर्णभेदाने आज अमेरिका हिंसाचारात होरपळत आहे. यापूर्वी म्हणजे बराक ओबामाच्या काळात असाच एक आणिबाणीचा प्रसंग उभा राहिला होता. पण, हुशार ओबामांनी बीअर पार्टी देऊन हा वाद मिटविला होता. देशात हिंसाचार होऊ दिला नव्हता. ती बीअर पार्टी जगाला नेहमीच आठवणीत राहणारी आहे. 

आज अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि पुढारलेल्या देशातही पुन्हा एका वर्णभेद उफाळून आला आहे. एकीकडे कोरोनासारखे भयावह संकटात एक लाख लोक मृत्यू पडले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे संकट उभे असताना आता दुसऱ्याच एका संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. एका कृष्णवर्णीय नागरिकाचा गोऱ्या अधिकाऱ्यांने गळा आवळून खून केल्याने देशभर हिंसक घटना घडत आहेत. 

कोरोनासारख्या संकटातही लोक रस्त्यावर उतरून डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करीत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सुरक्षित बंकरमध्ये हलविण्यात आले. कृष्णवर्णीयांसाठी आपला जीव पणाला लावणारे मार्टिन ल्यूथर किंग यांच्या हत्येनंतर म्हणजे 56 वर्षानंतर अमेरिकेत असा हिंसाचार उफाळून आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

एकीकडे लोक चंद्रावर वास्तव्यास जाण्याचा विचार करीत असताना जाती, धर्म, पंथ, वांशिक वाद कसे जपले जात आहेत. काही मंडळीचे रानटी विचार आजही बदलले नाहीत असे अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूप्रकरणावरून सिद्ध होत आहे. 

मिनेसोटा येथे 46 वर्षाय जॉर्ज यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाचा भडका उठला आहे. पोलिस आणि प्रशासनाविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील पोलिसांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला संपूर्ण अमेरिकेने नव्हे जगाने पाठिंबा दिला आहे. 

काय आहे प्रकरण ? 
गेल्या 25 मे 2020 रोजी मिनियापोलीस शहराच्या पोलिसांनी जॉर्जला बनावट नोटा बनविण्याप्रकरणी अटक केली होती. मात्र एका पोलिस अधिकाऱ्यांने त्याला शिक्षा देताता जॉर्ज यांची मान आठ मिनीटे गुडघ्याने दाबून ठेवली. त्यामुळे जॉर्जचा मृत्यू झाला. जॉर्जचा गुन्हा एवढा गंभीर होता का ? हाच प्रश्‍न संपूर्ण अमेरिकेत विचारला जात आहे. हाच प्रश्‍न ट्रम्प यांनाही लोक विचारत आहेत. 

त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येक अमेरिकन नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. आजही कृष्णवर्णीयांचा दुय्यम वागणूक दिली जात आहे. वांशिकता गोऱ्यांच्या मनातून निघत नाही असा आक्रोश केला जात आहे. आम्हालाही माणसासारखं का जगू देत नाही ? असे एक ना अनेक प्रश्‍न ट्रम्प प्रशासनाला विचारले जात आहे. 

ही झाली अमेरिकेतील सर्वात दुर्दैवी घटना. मात्र कृष्णवर्णीय असलेले माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाम हे मुरब्बी राजकारणी होते. त्यांच्या राजवटीत एक अशीच घटना घडली होती. पण, आपल्या हुशारीने ओबांमानी हे प्रकरण हाताळले होते. एका बीअर पार्टीने कृष्णवर्णीय आणि गोऱ्यांमधील वाद मिटला होता. 

अमेरिकेतील आजच्या हिंसाचारानंतर ओबामाची आठवण आली. नेमके त्यावेळी काय झाले होते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच ओबामा आणि ट्रम्प यांच्या जमीनआस्मानचा फरक आहे. ट्रम्प कधीच ओबामा होऊ शकत नाही अशा चर्चाही आता जगभर होत आहे. 

का दिली बीअर पार्टी ! 

बोस्टन येथे जुलै 2009 मध्ये एक घटना घडली होती. हार्वडचे प्रोफेसर हॅन्‍री लुईस गेट्‌स या कृष्णवर्णीयांना सार्जंट जेम्स क्‍लाऊले यांनी अटक केली होती. 
जेम्स हे गोरे होते. त्याचे झाले होते असे की अमेरिकेवरील तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर प्रचंड भीतीचे वातावरण होते. पोलीस डोळ्यात तेल घालून सुरक्षा करीत होते. गेट्‌स हे काही दिवसांचा परदेश दौरा करून रात्री घरी परतले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा जाम झाला होता. तो दरवाज उघडण्यासाठी ते खटाटोप करीत होते. 

गेट्‌स यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. रात्री कोणीतरी चोरीच्या हिशोबाने आले आहे अशी भीती वाटल्याने गेटस यांच्या शेजाऱ्यांनी 911 ला रिंग करून खबर दिली. तेथे जेम्स आपल्या पोलिस फौजफाट्यासह आले आणि त्यांनी गेट्‌स यांना अटक केली. वास्तविक गेट्‌स हे स्कॉलर आहेत. त्यांची चौकशी करायला हवी होती. पण समजगैरसमज झाले. 

गेट्‌स हे संतप्त झाले होते. ही बातमी माध्यमात झळकली. आमचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊनही आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. अर्थात कृष्णवर्णीय आणि गोरे हा वाद पेटला होता. या बातमीने राष्ट्राध्यक्ष ओबामा नाराज झाले होते. खरे तर दोघांचीही काही चूक नव्हती. पोलीस गोरे असले तरी त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले होते. प्रोफेसर आपले दार उघडत नाही म्हणून प्रयत्न करीत होते. कोणी मध्यरात्री तक्रार केली तर त्याची दखल घेणे गरजेचे होते. हे रामायण ओबामांच्या काळात घडले होते. 

ओबामा यांनी मात्र हा वर्णभेद उफाळून दिला नाही. गोऱ्या अधिकाऱ्याला आणि कृष्णवर्णीय स्कॉलरला व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये बीअर पार्टीसाठी निमंत्रित केले होते. या दोघांसोबत त्यांनी बीअर घेतली. समजगैरसमज दूर केले. 

आपण एक आहोत. प्रथम अमेरिकन आहोत याची आठवण करून दिली. त्यावेळी ओबामा म्हणाले होते, त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण आणि विचारशील संभाषण झाले. वाद मिटला आहे. कोणतीही कटुता राहिली नाही. या बीअर पार्टीची त्यावेळी जगभरच्या माध्यमांनी दखल घेत ओबामांच्या नेतृत्वाला सलाम केला होता. 

आज मात्र तिच अमेरिका वर्णभेदामुळे होरपळत आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हताश झाले आहेत. जे ओबामांना सूचले ते ट्रम्प यांना नाही कळले असे म्हणावे लागेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख