महाविकास आघाडीत कुठलीही अस्वस्थता नाही : शरद पवार

राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
no differences in state govenrment says ncp president sharad pawar
no differences in state govenrment says ncp president sharad pawar

पुणे : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांमध्ये मतभेद असून, हे सरकार लवकरच पडेल, अशी टीका विरोधी पक्ष करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाआघाडीत कोणतीही अस्वस्थता नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. 

शरद पवार यांनी आज पुण्यात व्यापारी संघटनेची बैठक घेतली. या वेळी बोलताना पवार म्हणाले की, सरकारमध्ये अस्वस्थता आणि नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र, तशी काही परिस्थिती नाही. सरकारमध्ये कुठलीही अस्वस्थता नाही. राज्यातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. माझी मुलाखत असल्यामुळे मी मातोश्रीवर गेलो होतो. मातोश्रीवर जाणे मला कमीपणाचे वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांना तसे वाटत असेल.

विरोधकांचे काम हे टीका करण्याचे आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचे काम दिसत नाही. आता कोरोनामुळे प्राधान्यक्रम बदलले आहेत. सरकारच्या पातळीवर 14 ते 15 तास बैठका होतात. अशा वेळी विरोधकांनी टीका करु नये. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत काही मुद्दा नाही. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील व्यापाऱ्यांनी शहरानजीक व्यापार स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, कोरोना महामारीचा परिणाम सर्वांच्याच आयुष्यावर झाला आहे. त्याची सगळ्यांनाच जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, दिल्लीसह इतर राज्यांना बसला आहे. पुणे हे औद्योगिक शहर असून, आयटीसाठी ते महत्वाचे आहे. पुण्यात व्यापाऱ्यांच्या 83 संघटना आहेत. बाजारपेठा बंद असल्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. पुण्यात व्यापार केंद्रित असून, तो विकेंद्रित करण्याचा विचार नाही. सरकारकडून येथे जमीन उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. याचबरोबर जागा देताना इतर सुविधाही तेथे असाव्यात, असे पवार यांनी नमूद केले. 

कोरोनाचे संकट अस्वस्थ करणारे आहे. राज्य सरकारने घातलेली बंधने स्वीकारण्याकडे सर्वांचा कल दिसत आहे. राज्याच्या तिजोरीवर आघात झाला आहे. या संकटाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. यामुळे सरकारने  नवे प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच पातळ्यांवरील खर्च कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे कठीण आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com