Bihar Election Updates : एनडीए ११५ जागांवर तर महागठबंधन ९७ जागांवर आघाडीवर - NDA Leading in Bihar Elections in Second Hour of Counting | Politics Marathi News - Sarkarnama

Bihar Election Updates : एनडीए ११५ जागांवर तर महागठबंधन ९७ जागांवर आघाडीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल दुसऱ्या तासात बदलले असून आता भाजप व जनता दल (यु)च्या एनडीएने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रीय जनता दल - काँग्रेसची महाविकास आघाडी ९७ जागांवर आघाडीवर आहे. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल दुसऱ्या तासात बदलले असून आता भाजप व जनता दल (यु)च्या एनडीएने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रीय जनता दल - काँग्रेसची महाविकास आघाडी ९७ जागांवर आघाडीवर आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. आज सकाळी तेथे मतमोजणी सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि लालूप्रसाद यांचे पूत्र तेजस्वी यादव यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चुरस आहे. आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन आघाडीवर होते. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या गोटात उत्साह पसरला होता.

बिहार निवडणूक कल (आघाडी) 
जेडीयू - ४७
भाजप - ६८
राजद - ७३
काँग्रेस - २४
लोजप - ०७
इतर - २४

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख