व्याजदरात कपात - मोदी सरकारची 24 तासांत माघार

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आपला निर्णय नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या चोवीस तासांत मागे घेतला आहे. त्यामुळे आता २०२० -२०२१ मध्ये असलेले व्याजदरच कायम राहणार आहे. हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारवर मोठी टीका झाली. त्यानंतर नजरचुकीने हा निर्णय घेतल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला.
Narendra Modi - Nirmala Sitaraman
Narendra Modi - Nirmala Sitaraman

नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आपला निर्णय नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या चोवीस तासांत मागे घेतला आहे. त्यामुळे आता २०२० -२०२१ मध्ये असलेले व्याजदरच कायम राहणार आहे. हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारवर मोठी टीका झाली. त्यानंतर नजरचुकीने हा निर्णय घेतल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman ) यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली. 

काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 ची समाप्ती झाली. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोदी (Narendra Modi) सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात (Interest Rates)  मोठी कपात केली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने केलेल्या या कपाती मुळे सामान्यांना धक्का बसला  होता. Narendra Modi Government Back Tracks with Decision to Reduce Interest Rates on Small Savings 

बचत खाते, पीपीएफ, टर्म डिपॉसिट, आरडी ते वयस्कर लोकांसाठीच्या असलेल्या बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सरकारने भरभक्कम अशी कपात केली होती. ही कपात नवे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये लागू असेल असे सांगण्यात आले होते. . आज 1 एप्रिलपासून लागू झालेले हे नवे व्याजदर 30 जून 2021 पर्यंत अंमलात असतील असेही सांगण्यात आले होते.

बचत खात्यामधील जमा रकमेवर वार्षिक व्याज 4 टक्क्यांवरुन कमी करुन 3.5 टक्के करण्यात आली होती. पब्लिक प्रॉव्हींडट फंड (PPF) वर आतापर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत होते, ते कमी करुन आता 6.4 टक्के करण्यात आले होते. 

एका वर्षाच्या जमा रकमेवरील तिमाही व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आणला गेला होता. वयस्कर लोकांच्या बचत योजनांवर आता 7.4 टक्क्यांऐवजी केवळ 6.5 टक्के इतकेच तिमाही व्याज मिळणार असे जाहीर करण्यात आले होते.  Narendra Modi Government Back Tracks with Decision to Reduce Interest Rates on Small Savings 

नॅशनल सेव्हींग्स सर्टिफिकेटवर 6.8 टक्क्यांऐवजी केवळ 5.9 टक्के व्याजदर दिला जाईल, सान विकास पत्रावर 6.9 टक्क्यांऐवजी 6.4 टक्के व्याज मिळेल तर मॅच्यूअर होण्याचा अवधी 124 महिन्यांवरुन वाढवून 138 महिने करण्यात आला होता. याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदराला 7.6 टक्क्यांवरुन 6.9 टक्क्यांवर आणण्यात आला होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com