पंतप्रधानांच्या 'मन की बात' ला पुन्हा विक्रमी डिसलाईक्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून 'मन की बात' केली. याला पुन्हा एकदा विक्रमी डिसलाईक्स आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात झालेल्या 'मन की बात' लाही प्रचंड प्रमाणात डिसलाईक्स आल्या होत्या
More Dislikes than Likes to PM Modi's Maan Ki Baat
More Dislikes than Likes to PM Modi's Maan Ki Baat

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून 'मन की बात' केली. याला पुन्हा एकदा विक्रमी डिसलाईक्स आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात झालेल्या 'मन की बात' लाही प्रचंड प्रमाणात डिसलाईक्स आल्या होत्या. काल झालेल्या 'मन की बात' च्या प्रतिक्रियांवर पंजाबमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल `मन की बात` या कार्यक्रमात देशातील नवीन तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिले. देशातील शेतकरी, युवा पढीला विशेष प्रोत्साहन देत त्यांनी देशातील अनेक उदाहरणे देऊन तंत्राचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती, ऐतिहासिक ठेवा जतन करीत त्याचे डिजिटलायझेन करून लोकांना त्याची सहल केल्याचा आनंद मिळावा, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी केलेल्या नवीन तरतुदीचा त्यांनी उल्लेख केला. पर्यटनावरही त्यांनी भर दिला होता.

मात्र, ही 'मन की बात' लोकांना पसंद पडल्याचे दिसत नाही. भाजपच्या यु-ट्यूब चॅनेवर या 'मन की बात'ला लाईक्सपेक्षा डिसलाईक्सच जास्त असल्याचे दिसत आहे. या चॅनेलवर केवळ ३६०० जणांनी ही 'मन की बात' आवडल्याचे नोंदवले आहे. तर ३१ हजार जणांनी ही 'मन की बात' आवडली नसल्याचे सांगत डिसलाईक दिले आहे. पंजाबमधून या 'मन की बात' ला मोठ्या प्रमाणावर कमेंट आल्या आहेत. तुम्ही हुकूमशहा आहात, ही लोकशाही नाही, अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेकांनी शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर कमेंट या पंजाबी भाषेत आहेत. आम्हाला 'मन की बात' नव्हे तर 'किसान की बात' हवी असेही एकाने नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ३० ऑगस्ट रोजी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” या कार्यक्रमाचा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने युट्यूबवर पोस्ट केला होता. त्याला सुमारे दहा लाख डिसलाईक्स आल्या होत्या. `मन की बात`ला मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स मिळाल्यानंतर भाजपमध्येही खळबळ उडाली होती. त्यात त्याच दिवशी देशाच्या जीडीपीचे आकडे सायंकाळनंतर जाहीर झाले होते. त्यामुळे `मन की बात`बद्दलची नाराजी आणखी वाढली होती. या डिसलाईक्समागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांनी त्यावेळी केला होती.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com