देश जवानांच्या मागे भक्कमपणे उभा; अधिवेशनातून देणार संदेश - Monosoon Session of Parliament Starts from Today | Politics Marathi News - Sarkarnama

देश जवानांच्या मागे भक्कमपणे उभा; अधिवेशनातून देणार संदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या संकटाच्या काळात संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या कामकाजाच्या आधी पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते. सकाळी नऊ वाजता लोकसभेची बैठक सुरू झाली. अन्य दिवशी दुपारी तीन ते सांयकाळी सात वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे.

नवी दिल्ली : आपले वीर जवान सीमेवर पाय रोवून उभे आहेत. मोठ्या हिंमतीने दुर्गम पहाडांमध्ये उभे आहेत. काही काळातच बर्फ वर्षाव सुरु होईल. ज्या विश्वासाने ते देशाच्या रक्षणासाठी उभे आहेत, या सभागृहांचे सर्व सदस्य एकमताने, एका संकल्पाने, संदेश देतील की सेनेच्या जवानांमागे देश उभा आहे. संसद व संसद सदस्यांच्या माध्यमातून उभा आहे. हा मजबूत संदेश संसद व सर्व सदस्य देतील हा विश्वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कोरोनाच्या संकटाच्या काळात संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या कामकाजाच्या आधी पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते. सकाळी नऊ वाजता लोकसभेची बैठक सुरू झाली. अन्य दिवशी दुपारी तीन ते सांयकाळी सात वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे. याचप्रमाणे राज्यसभेची बैठक आज पहिल्या दिवशी (ता. 14 सप्टेंबर) दुपारी तीन सांयकाळी सातपर्यंत असेल. तर अन्य दिवशी सकाळी नऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही बैठक असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून ही बैठक होणार आहे. यासाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, यासाठी सर्व दालन आणि गॅलरीमध्येही बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 

पंतप्रधान म्हणाले, "बजेट सत्र थांबवावे लागले होते आताही एकवेळा लोकसभा एक वेळा राज्यसभा, असे कामकाज होणार आहे
शनिवार रविवारती सुट्टी रद्द करावी लागली आहे. वेळही बदलावी लागली आहे. मात्र, या अभूतपूर्व परिस्थितीत सर्व सदस्यांनी याचे स्वागत केले आहे.  या अधिवेशानात  अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. अनेक विषयांवर चर्चा होईल. लोकसभेत जेवढी चर्चा जास्त तेवढा सभागृहाला व देशालाही खूप फायदा होतो. यावेळीही या महान परंपरेत आम्ही सर्व जण भर टाकू,"

''कोरोनाने जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे पालन सर्वांना करावे लागेल. दवाई नाही तबतक ढिलाई नही. लवकरात लवकर जगभरातून कुठूनही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यातून जगभरातला प्रत्येक जण या संकटातून बाहेर पडू शकेल," असेही मोदी म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख