Modiji, did you forget Goat Eid? Owaisi's question | Sarkarnama

मोदीजी, बकरी ईद विसरलात का ? औवैसींचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

ट्विट करताना औवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे. मोदी यांनी चीनवर बोलणे अपेक्षित होते, पण बोलले चन्यावर.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधन करताना गरीब कल्याण योजनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक सणांचा उल्लेख केला मात्र ते बकरी ईद विसरले का ? असा सवाल खासदार असद्दीन औवैसी यांनी केला आहे. 

ओवैसी यांनी केलेल्या ट्विटमध्ये मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना गरीबांना आणखी काही महिने मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मोदींनी आपल्या भाषणात छट पूजा आणि दिवाळीचाही उल्लेख केला पण, ते बकरी ईद विसरले का ? असा सवाला केला आहे.

भाषणात त्यांनी चीनवर का टीका केली नाही. खरेतर भारत आणि चीनमध्ये संघर्ष पेटला आहे. तो सध्या संवेदनशील विषयी बनला असताना मोदींनी या विषयाला स्पर्शही केला नाही याबद्दल ओवैसी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. याअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत धान्य देणे कायम ठेवले जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत 1.75 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी आज देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी अनलॉक-2 मधील आव्हानांचाही आढावा घेतला.

ते म्हणाले की, आपण आता अनलॉक-1 मधून अनलॉक-2 मध्ये जात आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे.  वेळेत घेतलेले निर्णय आणि उपाययोजना यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनलॉक 2.0 मध्ये जातना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

आता थंडी, ताप, खोकल्याचा हंगाम सुरू होत आहे. या परिस्थितीत मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी स्वत;ची काळजी घ्यावी. अनलॉक 1 मध्ये अनेक जण बेफिकीर झाल्याचे दिसून आले. आता त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहेत. यामुळे मास्क इतर साधने वापरून तुमचे संरक्षण तुम्हीच करा.

ट्विट करताना औवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे. मोदी यांनी चीनवर बोलणे अपेक्षित होते, पण बोलले चन्यावर. खरंतर त्याची काही गरज नव्हती. मोदी यांच्या अनलॉकडाऊनमध्ये गरीबा लोकांचे हाल झाले. गरीबांना उपाशी झोपावे लागले. मोदीजी आपण कालच्या भाषणामध्ये येणाऱ्या दिवाळी, छटपुजेबरोबर अन्य काही सणाचा उल्लेख केला. पण, आपण बकरी ईद विसरला! असो मोदीजी तरीही आपणास बकरी ईदच्या शुभेच्छा ! 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख