ममतादीदी विजयी झाल्या अन् म्हणाल्या, आता सगळ्यांनी आपापल्या घरी जावे! - Mamata Banerjee's reaction after the victory  | Politics Marathi News - Sarkarnama

ममतादीदी विजयी झाल्या अन् म्हणाल्या, आता सगळ्यांनी आपापल्या घरी जावे!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एका ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एका ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. नंदीग्राम मतदार संघात ममता बॅनर्जी आणि भाजपचे उमेदवार शुभेन्दु अधिकारी यांच्या अटीतटीची लढत सुरु होती. शेवटच्या फेरीत बॅनर्जी यांनी १२०० मतांनी आघाडी घेत विजय मिळवला, त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणीही विजयी मिरवणूक काढू नये असे आवाहान बॅनर्जी यांनी केले.  

त्या म्हणाल्या की ''हा बंगालच्या लोकांचा विजय आहे''. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. कोरोनाचा प्रादुर्भाव पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की कोणीही विजयी मिरवणूक काढू नये. प्रत्येकाने घरी जावे, संध्याकाळी ६ नंतर मी माध्यमांशी संवाद साधणार'' असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. 

दरम्यान, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत रंगली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शुभेन्दु अधिकारी यांनी ७००० हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ती आघाडी तोडत पुन्हा अधिकारी यांच्यावर २७०० मतांची आघाडी घेतल्यामुळे तृणमूला दिलासा मिळाला होता. १६ व्या फेरीत तर सुभेन्दु अधिकारी ६ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर शेवटच्या फेरीत ममता बॅनर्जी यांनी निर्मणायक १२०० मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसने २०९ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष १ जागेवर आघाडीवर आहे.

ममता बॅनर्जी या नंदीग्रामधून विडवणूक लढवत असल्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठीच भाजपाने या मतदारसंघासाठी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि तृणमूलचे फायरब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांना पक्षात आयात करून उमेदवारी दिली होती. 

पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, तृणमूलने निर्णायक आघाडी घेल्यामुळे हा अंदाज फोल ठरतांना दिसत आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकत पणाला लावली होती.  

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार असल्याचे सुरुतीच्या कलामध्ये दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख