ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस अन् सरकारवरील पकड ढिली

पश्चिम बंगालमध्ये विस्तार करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडूनही भाजपला रोखण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये सध्या जुंपली आहे.
mamata banerjee lost control over party and leders says bjp leader dilip ghosh
mamata banerjee lost control over party and leders says bjp leader dilip ghosh

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तुलना विषारी सापाशी केली आहे. बांकुरा येथे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करताना बॅनर्जी यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. ममता बॅनर्जी यांची पक्षावरील पकड पूर्णपणे ढिली झाली आहे, अशी टीका भाजपने केली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पक्ष आणि सरकारवरील पकड ढिली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये तळापासून भ्रष्टाचार पसरला आहे. पक्षांतर्गत संघर्षामुळे कोणाला काय करावे हेच कळत नाही. यामुळे काही नेते बेताल वक्तव्ये करुन पक्षाच्या दुरवस्थेवरून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांना आम्ही महत्व देत नाही. निराश मानसिकतेतून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. 

तृणमूल काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.  इंधन दरवाढीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला. या वेळी बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, विषारी साप ज्याप्रमाणे माणसांना मारुन टाकतो, त्याप्रमाणे देशातील नागरिक आता मरत आहेत. याला निर्मला सीतारामन या कारणीभूत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. देशाच्या इतिहासातील त्या सर्वांत वाईट अर्थमंत्री ठरल्या आहेत. 

याआधी कल्याण बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नवा भारत घडविण्याचे स्वप्न दाखविले. प्रत्यक्षात त्यांनी विकासदराची वाढ खाली आणली. आता विकासदर त्यांनी एकदम तळाला पोचविला आहे. 

तृणमूलची वकिली करणारे बॅनर्जी 

कल्याण बॅनर्जी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. बॅनर्जी हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, वकील आहेत. तृणमूल काँग्रेसशी निगडित खटल्यांचे कामकाज तेच सांभाळतात. ते कोलकता उच्च न्यायालयात  1981 पासून वकिली करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com