महिंदा राजपक्षे यांनी घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ 

महिंदा 2005 ते2015पर्यंत ते श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
महिंदा राजपक्षे यांनी घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ 

कोलंबो: : श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून महिंदा राजपक्षे यांनी आज चौथ्यांदा शपथ घेतली. त्यांचे थोरले बंधू आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी त्यांना शपथ दिली. 

श्रीलंकेत आश्‍चर्यकारक घडामोडी घडल्या आहेत. नवे पंतप्रधान राजपक्षे श्रीलंकेतील बलशाली नेते म्हणून ओळखले जातात. उत्तर कोलंबियातील केलनियातील एका बुद्ध मंदिरात राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. येथील स्थानिक वेळेनुसार म्हणजे सकाळी 9.32 वाजता हा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

महिंदा 2005 ते2015पर्यंत ते श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तसेच 2004 ते 2005 पर्यंत म्हणजेच एक वर्ष पंतप्रधान होते. गेल्या पाच ऑगस्टरोजी श्रीलंकेत पार पडलेल्या ससंदीय निवडणुकीत राजपक्ष यांच्या बंधुच्या पक्षाला म्हणजेच श्रीलंका पोदुजन पेरामुना पक्षाला (एसएलपीपी) स्पष्ट बहुमत मिळाले होते.225 पैकी 145 जागा या पक्षाने जिंकल्या होत्या. 

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनाम्यानंतर महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या ऑगस्टमध्ये श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. श्रीलंका पार्लिमेंट बोड बरखास्त करण्याचा निर्णय सिरिसेना यांनी घेतला होता हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत येथील सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबादल केला होता. त्यामुळे महिंदा यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते आणि विक्रमसिंघे पंतप्रधान बनले होते. आता निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाने बाजी मारली आहे. 

महिंदा बंधुनी तमिळ वाघांचा निपात करण्याची मोहीत हाती घेतल्याने ते जगभर चर्चेत आले होते. महिंदा हे आता श्रीलंकेतील सर्वात बलशाली नेते म्हणून पुन्हा एकदा पुढे आले आहे. दोघा भावांकडे श्रीलंकेची सर्व सूत्रे हाती गेली आहेत.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com