सावधान : राज्यात दिवसभरात कोरोनामुळे २६७ जणांचा बळी

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रातील रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्या आता पावणेचार लाखांवर पोचली असून, बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.
maharashtra state records 267 covid19 deaths in last 24 hours
maharashtra state records 267 covid19 deaths in last 24 hours

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरात आज कोरोनाचे 9 हजार 431 रुग्ण आढळले. यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोचली आहे. राज्यात आज दिवसभरात कोरोनामुळे  267 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 13 हजार 656 झाला आहे. 

राज्यात सध्या एकूण 1 लाख 48 हजार 601 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज 6 हजार 44 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण 2 लाख 13 हजार 238 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.74 टक्के झाले आहे.

राज्यात आज एकूण 267 मृत्यूंची नोंद झाली असून, यात मुंबई 57, ठाणे जिल्हा 130, पुणे मंडळ 75, नाशिक 23, औरंगाबाद मंडळ 12, कोल्हापूर 6, लातूर मंडळ 4, अकोला मंडळ 13, नागपूर 3, इतर राज्य 1 येथील मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.63 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 18 लाख 86 हजार 296 नमुन्यांपैकी 3 लाख 75 हजार 799 (19.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 8 हजार 420 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत; तर 44 हजार 276 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत आज 1 हजार 115 कोरोना रुग्णांची भर पडली असून, एकूण बाधितांची संख्या 1 लाख 9 हजार 96 वर पोचली आहे. मुंबईत आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृतांचा आकडा 6 हजार 90 झाला आहे. मुंबईत आज एका दिवसात 1 हजार 361 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, रुग्णदुपटीचा दर हा आता 67 दिवसांवर गेला आहे; तर रुग्णवाढीचा दर 1.3 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 57 मृत्यूंपैकी 41 जणांना दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 35 पुरुष; तर 22 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी पाच जण चाळिशीच्या खाली तर, 34 रुग्ण 60 वर्षांवरील होते. तर, 18 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. बाधितांची संख्या वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज 1,361 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 80 हजार 238 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

धारावीत आज केवळ दोन रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 531 झाली आहे. सध्या धारावी परिसरात 113 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धारावीत आज कोरोनामुळे मृत्यूची नोंद झाली नाही.  दादरमध्ये आज 29 रुग्ण सापडले असून, रुग्णांची एकूण संख्या ही 1 हजार 618 झाली आहे, तर 467 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज 22 नवीन रुग्णांची भर पडल्याने, रुग्णांची संख्या 1 हजार 605 झाली, तर 220 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. धारावी,दादर,माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होतआहे. आतापर्यंत दादरमध्ये एकूण 1 हजार 78, माहीममध्ये एकूण 1 हजार 315, तर धारावीत 2 हजार 168 असे एकूण 4 हजार 561 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com