मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब; जोतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांना झुकते माप मिळणार

मध्य प्रदेशातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून, यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांना झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.
madhya pradesh cabinet expansion likely to be tommorrow
madhya pradesh cabinet expansion likely to be tommorrow

नवी दिल्ली :  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हे उद्या (मंगळवारी) मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. चौहान यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसपासून दूर झालेले आणि राज्यातील सत्तापालटास कारणीभूत ठरलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या 8 ते 9 आमदारांसह किमान दोन डझन मंत्री उद्या शपथ घेतील अशी चिन्हे आहेत. 

मध्य प्रदेशातील सत्तांतरानंतरच्या या पहिल्या व बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा शपथविधी होईल. राज्यपाल लालजी टंडन गंभीर आजारी असल्याने राज्यपालपदाची सूत्रे पटेल यांच्याकडे  सोपविण्यात आली आहेत. राज्यात तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिंदे आपल्या गटासह भाजपमध्ये गेल्याने वर्षभरापूर्वीचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. नंतर भाजपने येथे सरकार बनवले. 

त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरू असल्याने चौहान यांच्यासह तीनच मंत्र्यांनी शपथ घेतली. मध्य प्रदेशाच्या विधानसभा सदस्य संख्येनुसार 35 मंत्री बनू शकतात. चौहान यांना  काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार आणि राज्यातील भाजप नेते यांच्यात समतोल साधण्याची कसरत करावी लागणार आहे. शिवराजसिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर काही बोलण्यास नकार दिला. मात्र, मंत्रिमंडळातील 24 ते 25 प्रस्तावित मंत्र्यांच्या यादीला भाजप आणि केंद्राच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौहान यांच्याकडे  शिंदे यांनी 30 लाखाचा धनादेश कोरोनाच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री मदतनिधीला दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आठ ते नऊ आमदार निश्चित मानले जातात. मात्र, राज्यातील जातीय समीकरणांकडेही भाजपला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा थेट परिणाम प्रस्तावित 24 विधानसभा पोटनिवडणुकीवर होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com