काय सांगता! लॉकडाउनने उडवली झोप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसत असताना आता त्याचे शारिरीक परिणामही दिसू लागले आहेत. लॉकडाउनमुळे झोपेवरही परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
lockdown impact on sleep
lockdown impact on sleep

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आल्याने तरुणांपासून ते लहानथोरांपर्यंत सगळेचजण घरात अडकून पडले आहेत. एरवी रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणाऱ्या तरुणाईलाही चार भिंतीत कोंडून घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत ही मंडळी सोशल मीडियाच्या आहारी गेली नसती तरच नवल. जुन्या मालिका, वेब सीरिज, ऑनलाईन गेम्स, आणि व्हिडिओ चॅटिंग यामुळे त्यांच्या झोपेचे पार खोबरे झाले आहे. 

लॉकडाउनच्या नवव्या आठवड्याला सामोरे जाणारी मंडळी आता विविध आरोग्यविषयक समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येते. सतत स्क्रीनसमोर बसून राहणाऱ्या मंडळींना ताण तणाव आणि निद्रानाशासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अनेकांच्या झोपेचे चक्रच बिघडले असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

तेव्हापासून समस्या वाढल्या 

लॉकडाउन लागल्यापासून लोकांच्या झोपेच्या समस्या देखील वाढल्याचे बंगळूरमधील एका वैद्यकीय संस्थेने म्हटले आहे. लॉकडाउनमुळे बहुसंख्य लोकांना घरून काम करावे लागत असले तरीसुद्धा त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावते आहे, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या पाहणीमध्ये तब्बल दीड हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील ४४ टक्के लोकांनी लॉकडाउन झाल्यापासून आम्ही सहा तासांपेक्षाही कमी झोप घेतल्याचे सांगितले. झोपेच्या समस्या असणाऱ्या लोकांचे  २५ मार्चआधी प्रमाण हे २६ टक्क्यांपेक्षाही कमी होते, असे बंगळूरमधील स्लीप सोल्युशन या संस्थेने म्हटले आहे. एकीकडे काही लोकांची झोप कमी झाली आहे तर दुसरीकडे काहींना जास्त वेळ झोपण्याचा आजार जडला आहे. 

रात्री अंथरुणात गेल्यानंतर देखील तुम्हाला झोप लागत नसेल तर पुस्तक वाचा, काही हलक्या क्रिया करा, ज्यामुळे तुम्हाला निवांतपणा वाटेल, असा सल्ला दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयातील वैद्यकीय चिकित्सक विवेक नानगिया यांनी दिला. 

म्हणून उडाली झोप 

- नोकरीचे कसे होणार? 
- भविष्यात पैसे पुरतील का? 
- मला आजार तर होणार नाही ना? 
- कार्यालयाचे काम वेळेत कसे पूर्ण करू? 

हे करा 

- योगासने 
- शारीरिक व्यायाम 
- संगीत ऐकणे 

झोपण्यापूर्वी हे नको 

- मोबाईल पाहणे 
- लॅपटॉपवरील काम 
- कोला, अल्कोहोलचे सेवन 
- कॉफी आणि चहाचे सेवन 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com