लाच प्रकरणात दोषी असलेले कर्नाटकचे आयएएस अधिकारी विजय शंकर यांची आत्महत्या?

य माॅनेटरी अॅडव्हायजरी पाँझी योजना घोटाळ्यात अडकलेले आयएएस अधिकारी विजय शंकर यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. विजय शंकर यांच्यावर खटला चालवण्यासाठी सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक सरकारकडे परवानगी मागितली होती
Vijay Shankar Karnataka IAS Officer Found dead in His house
Vijay Shankar Karnataka IAS Officer Found dead in His house

बंगळुरू : आय माॅनेटरी अॅडव्हायजरी पाँझी योजना घोटाळ्यात अडकलेले आयएएस अधिकारी विजय शंकर यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. विजय शंकर यांच्यावर खटला चालवण्यासाठी सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक सरकारकडे परवानगी मागितली होती. 

विजय शंकर यांनी या घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान याला दीड कोटी रुपयांची लाच घेऊन क्लिन चीट दिली होती. या योजनेत जादा परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. विजय शंकर यांच्या व्यतिरिक्त सीबीआय आणखी दोन अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. 

कर्नाटक सरकारना आय माॅनेटरी अॅडव्हायझरी ज्वेल्सच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. एल सी नागराज हे त्यावेळी बंगळुरु उत्तर तालुक्याचे सहाय्यक आयुक्त होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला. विजय शंकर यांनीही हा अहवाल मान्य करुन कुठल्याही चौकशीविना तो राज्य सरकारकडे पाठवला. गाव लेखापाल मंजुनाथ या अधिकाऱ्याने याने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम पाहिले व आरोपी मन्सूर खान यांच्याकडून विजय शंकर यांच्या वतीने दीड कोटींची लाच घेतली होती. या योजनेतले बहुसंख्य गुंतवणूकदार हे मुस्लिम नागरिक होते. 

दरम्यानच्या काळात मन्सूर खान देश सोडून दुबईला पळाला. त्याचे नंतर प्रत्यार्पण करण्यात आले. या प्रकरणी सुमारे पंचवीस जणांना अटक करुन त्यांच्यावर खटला चालवण्यात येत आहे. हे प्रकरण २०१९ मध्ये उघडकीला आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com