मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताच येडियुरप्पांना भ्रष्टाचाराबाबत कोर्टाची नोटीस

ही नोटीस येडियुरप्पा यांच्यासह त्यांचे सुपुत्र बी. वाय. विजयेंद्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळाली आहे.
Karnataka High Court issues notice to Yeddyurappa
Karnataka High Court issues notice to Yeddyurappa

बंगळूर : मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना उच्च न्यायायलयाची भ्रष्टाचाराबाबतची नोटीस मिळाली आहे. याबाबत येडियुरप्पा काय पाऊल उचलतात, हे पाहावे लागणार आहे. ही नोटीस येडियुरप्पा यांच्यासह त्यांचे सुपुत्र बी. वाय. विजयेंद्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळाली आहे. (Karnataka High Court issues notice to Yeddyurappa)

कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी मंत्री एस. टी. सोमशेखर आणि एक आयएएस अधिकारी यांना गृहनिर्माण प्रकल्पात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नोटीस बजावली आहे.

न्यायमूर्ती एस. सुनील दत्त यादव यांच्या एकल खंडपीठाने टी. जे. अब्राहम या कार्यकर्त्याच्या याचिकेवर त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. येडियुरप्पा आणि सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी न मिळाल्याने विशेष न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले होते. जे त्या वेळी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. बंगळूर विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कंत्राटदाराकडून किकबॅक घेतल्यासंबंधी हा खटला आहे.

कर्नाटक विधानसभेत या विषयावर चर्चाही झाली होती. जेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि गंभीर आरोप केले. येडियुराप्पा आणि त्यांच्या मुलाने या प्रकरणामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.

कर्नाटक मंत्रिमंडळासाठी आजचा मुहूर्त

दरम्यान, कर्नाटकातील बहुप्रतिक्षित बसवराज बोम्मई मंत्रिमंडळाचा उद्या (ता. ४) सायंकाळी पाच वाजता राजभवनाच्या ग्लास हाउसमध्ये शपथविधी होणार आहे. भाजप हायकमांडने मंत्र्यांची यादी तयार केली असून त्यांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत. राजभवनात राज्यपाल थावरचंद गेहलोत नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनात आवश्यक तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे आमदार वगळता अधिक अन्य कुणीही राजभवनात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com