कोरोना संकटातही भाजप नेत्याचा...होऊ दे खर्च!

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक शहरांमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. या परिस्थितीत एका भाजप नेत्याने जंगी वाढदिवस साजरा केल्याने खळबळ उडाली आहे.
karnataka bjp leader hosted birthday party in corona lockdown
karnataka bjp leader hosted birthday party in corona lockdown

गदग : देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अर्थचक्र मंदावूनही अनेक शहरांमध्ये लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. याचा परिणाम काही जणांवर अजिबात झालेला नाही. कर्नाटकातील भाजपचे नेते शिवन्ना गौडा यांचीही यातच गणना करावी लागेल. कारण त्यांनी जंगी वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचेही समोर आले आहे. 

कर्नाटकात सध्या भाजपचेच सरकार सत्तेत आहे. सरकारने जास्त संख्येने नागरिकांना एकत्र येण्यास मनाई केली असून, गर्दी जमा होईल, अशा कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारी पातळीवर यंत्रण रात्रंदिवस काम करीत आहे. अशा परिस्थितीत भाजप नेत्यानेच सरकारी नियमांना हरताळ फासल्याने जनता रोष व्यक्त करीत आहे.  राज्यात कोरोनाचे एकूण 33 हजार 418 रुग्ण आहेत. यातील 19 हजार 39 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 13 हजार 836 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

भाजप नेते शिवन्ना गौडा यांनी शुक्रवारी रात्री वाढदिवसाची जंगी पार्टी आयोजित केली होती. कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्री रामुलू यांचे गौडा हे निकटवर्ती आहेत. गौडा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक पाहुणे आले होते. अनेक जण विनामास्क आणि शारीरिक अंतराच्या नियमाचा भंग करुन पार्टी करीत होते. या पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन राज्यातील सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. 

काल रात्री ही पार्टी झाली आहे. पोलिसांनी पार्टीचा व्हिडीओ तपासण्यास सुरूवात केली आहे. या पार्टीत अनेक जण विनामास्क दिसत असून, ते शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. या व्हिडीओची तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गदगच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. 

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज एक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com