गुन्हेगारही कायद्याच्या चौकटीपर्यंत पोचवता येत नाहीत एवढे सरकार दुबळे कसे ?

कानपूरनजीक चकमकीत गँगस्टर विकास दुबे हा ठार झाला असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारला लक्ष्य केले आहे.
kapil sibal targets yogi adityanath over gangster vikas dubey encounter
kapil sibal targets yogi adityanath over gangster vikas dubey encounter

लखनौ : कानपूरनजीक काल सकाळी झालेल्या चकमकीत गँगस्टर विकास दुबे हा ठार झाला होता. या चकमकीवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उत्तर प्रदेश सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून, सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की, विकास दुबेसारख्या गँगस्टरला मध्य प्रदेशातून सुरक्षितपणे उत्तर प्रदेश सरकार घेऊन जाऊ शकली नाही. एका आरोपीला न्यायालयात सुरक्षितपणे हजर करता आले नाही एवढे सरकार दुबळे आहे का? विकास दुबेचे अनेक जणांशी असलेले संबंध लपविण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात ठोकी राज हाच कायदा झाला आहे. हे विकासाचे राजकारण आहे का? विकास दुबेशी निगडित पक्ष आणि व्यक्तींना वाचविण्याचा हा प्रयत्न आहे.  

या चकमकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. पोलिसांच्या निवदेनानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन जात होता. कानपूरनजीक पोचल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर अचानक गाई आणि म्हशींचा कळप आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेशुद्ध झाले. मात्र, विकास दुबे हा शुद्धित होता. तो पोलिसांचे पिस्तुल घेऊन पलायन केले. 

पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.  

बॉलिवूडमधील थरारक चित्रपटाप्रमाणे शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. या चकमकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास दुबे आणि राजकीय नेत्यांचे असलेले संबध लपविण्यासाठीच चकमकीत विकास दुबेला मारण्यात आले, असा दावाही करण्यात येत आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com