मोदी सरकार अजून लॉकडाउनमध्ये चाचपडतेय : कपिल सिब्बल

देशात कोरोनाचा कहर वाढलेला असताना राजकीय ज्वरही चढू लागला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये कोरोनाच्या मुद्द्यावरुन जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. कोरोना संकट मोदी सरकारला योग्य पद्धतीने हाताळता आले नाही, यावरुन भाजपला लक्ष्य करण्याची मोहीम काँग्रेसकडून सुरू आहे.
kapil sibal targets central government over lockdown policy
kapil sibal targets central government over lockdown policy

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनवरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारला कोणत्या मार्गाने पुढे जावे आणि कोणते धोरण आखावे हे कळाले नसून, सरकार अद्याप चाचपडत आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. 

मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा करणाऱ्या सरकारला देशात १४ मे पर्यंत ७३ जण भूकबळी ठरले आहेत हेही माहिती नाही, असे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले, की सरकार फक्त २८ लाख लोकांच्या मदतीचा आकडा सांगत आहे. देशाचा विचार करता सुमारे १२ कोटी स्थलांतरित मजूर आहेत. त्यांचा तपशील सरकारकडे अजूनही नाही. या स्थलांतरित मजुरांसाठी पीएम केअर फंडातून किती रक्कम देण्यात आली, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. 

देशात केवळ चार तासांच्या सूचनेनंतर लॉकडाउन लागू करणाऱ्या सरकारकडे आता त्यातून बाहेर पडण्याचे धोरण नाही, अशी खिल्ली सिब्बल यांनी उडवली. ते म्हणाले की, सरकारकडून एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना येत आहेत. आतापर्यंत सरकारचे धोरण समाजात फूट पाडण्याच्या राजकारणाचे होते. परंतु, कोरोनाच्या संकटाने सरकारला या धोरणात बदल करण्यास भाग पाडले. आता सरकारला कळत नाही देश कसा चालवावा. मोदी सरकारकडे संकटकाळात काम कसे करावे याचा कोणताही अनुभव नाही. 

देशभरात उद्यापासून लॉकडाउनचा पाचवा टप्पा लागू होत असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत चारवेळा लॉकडाउन वाढविण्यात आला. देशभरात आज एकाच दिवसात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ३८० ने वाढली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या आता १ लाख ८२ हजार ४९० झाली. आता पाचव्यांदा लॉकडाउन वाढविला जात आहे. लॉकडाउनबद्दल सरकारचे धोरण काय, कोरोनाशी लढाईची नेमकी रणनिती काय, आर्थिक अरिष्टातून कसे बाहेर पडणार, याची उत्तरे सरकारने द्यावीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com